मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची आज ईडी चौकशी होणार आहे. दरम्यान, त्यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर गर्दी केली आहे. रोहित पवार यांच्या चौकशी दरम्यान खासदार शरद पवार राष्ट्रवादी कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. तर खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित राहणार आहेत. आज सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे.
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कार्यालयाबाहेर आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात सुप्रिया सुळेही सहभाग घेणार आहेत. कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये असे आवाहनही रोहित पवार यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ईडीने बारामती अँग्रोमध्ये धाड टाकली होती.
महाविकास आघाडीतील तीन नेत्यांना ईडीचे समन्स आले आहे. यात राष्ट्रवादीचे रोहित पवार, शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर, शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांचा समावेश आहे.