38.1 C
Latur
Friday, April 25, 2025
Homeमहाराष्ट्रनाशिकमध्ये ईडीची एकाच वेळी ९ ठिकाणी छापेमारी

नाशिकमध्ये ईडीची एकाच वेळी ९ ठिकाणी छापेमारी

मालेगाव : नाशिकमधील मालेगावात ईडीने मोठी कारवाई केली असून अंमलबजावणी संचालनालय म्हणजे ईडीने मालेगावात एकाच वेळी ९ वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले आहे. अवैध बांगलादेशी प्रकरणी ही कारवाई केली जात असल्याचे म्हटले आहे.

नाशिकच्या मालेगावमध्ये कथित बांगलादेशी आणि रोहिंग्यांना मोठ्या संख्येने चुकीच्या पद्धतीने जन्म प्रमाणपत्र दिले जात असल्याचा आरोप माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. यानंतर भारत देशातून बांगलादेशी घुसखोरांना तातडीने हाकलून काढा, अशी मागणी कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. आता याप्रकरणी ईडीने मालेगावात छापेमारी केली आहे.

बांगलादेशी बोगस जन्म दाखला प्रकरणात अटक करण्यात आलेले तव्वाब शेख यांच्या राहत्या घरी अंमलबजावणी संचालनालयाने शुक्रवारी २५ एप्रिल रोजी छापेमारी केली. ईडीने मालेगावात एकाच वेळी ९ वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. यावेळी बनावट जन्म आणि मृत्यू दाखले बनवण्याच्या प्रकरणात ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला. महाराष्ट्र पोलिसांनी या संदर्भात दाखल केलेल्या १६ वेगवेगळ्या तक्रारींच्या आधारावर ईडीने ही कारवाई केली आहे.

सध्या मालेगावात ईडीचे मोठे सर्च ऑपरेशन सुरू आहे. अवैध बांगलादेशी प्रकरणात ही मोठी कारवाई असल्याचे समजते. तव्वाब शेख हे मालेगाव महानगरपालिका जन्म-मृत्यू विभागात कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्या घरी ईडीने छापेमारी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR