23.4 C
Latur
Sunday, September 29, 2024
Homeमहाराष्ट्रफेअर प्ले प्रकरणी ईडीचे मुंबई, पुण्यात छापे

फेअर प्ले प्रकरणी ईडीचे मुंबई, पुण्यात छापे

कोट्यवधींची मालमत्ता जप्त, विदेशी बेनामी कंपन्यांचे कनेक्शन समोर

मुंबई : ईडीने फेअर प्ले प्रकरणी १२ जून रोजी मुंबई आणि पुण्यातील १९ ठिकाणी छापे टाकले आहेत. फेअर प्ले अ‍ॅपने आयपीएल क्रिकेट सामन्याचे बेकायदेशीरपणे प्रसारण केल्याचा आरोप आहे. तसेच नुकत्याच झालेल्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दरम्यान या अ‍ॅपचा बेटींगसाठी वापर केल्याचे आढळून आले असल्याने ईडीने ही कारवाई केली. झडतीदरम्यान ईडीने, बँक फंड, डीमॅट खातंसह लक्झरी घड्याळ अशी एकूण ८ कोटीची मालमत्ता जप्त केली आहे, अशी माहिती ईडीच्या मुंबई विभागीय कार्यालयाकडून देण्यात आली आहे. या प्रकरणात चौकशी आणि तपास सुरु असल्याची माहिती ईडीकडन देण्यात आली आहे.

वायकॉम १८ मीडिया प्रायव्हेट लिमिटेडने नोडल सायबर पोलिस, मुंबई यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. आयपीसी १८६०, माहित तंत्रज्ञान कायदा, २००० आणि कॉपीराईट कायदा १९५७ नुसार फेअर प्ले स्पोर्ट एलएलसी आणि इतरांविरोधात १०० कोटी रुपयांच्या नुकसान प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवरुन ईडीने कारवाई केली आहे.

ईडीने तपासा दरम्यान सर्व बँक खाती गोठवली असून ईडीला अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणेही सापडली आहेत. फेअर प्लेने दुबई आणि कुराकाओ येथील परदेशी संस्थांद्वारे सेलिब्रिटींचे प्रतिनिधित्व करणा-या भारतीय एजन्सींसोबत करार केले असल्याचेही उघड झाले. फेअर प्लेने गोळा केलेला निधी अनेक बोगस आणि बेनामी बँक खात्यांमधून घेण्यात आला होता असा आरोप आहे. ईडीने केलेल्या तपासात आढळून आले की यामध्ये शेल कंपन्यांच्या कॉम्प्लेक्स वेब ऑफ बँक अकाऊंटचा वापर करण्यात आला.

ईडीने केलेल्या तपासात आढळून आले की परदेशातील शेल कंपन्यांनी पैसा पाठवला होता. यामध्ये हाँगकॉग, चीन आणि दुबईतील बेनामी कंपन्यांचा समावेश होता. या प्रकरणात बेनामी आस्थापनांच्या ४०० हून अधिक खात्यांचा वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे. फेअर प्लेनं नेमक्या कशा प्रकारे पैसा गोळा केला याची चौकशी सुरु असल्याचं ईडीकडून सांगण्यात आलं आहे.

आयपीएलचे बेकायदा प्रसारण
आयपीएलच्या सामन्यांच्या मोबाईल आणि वेबसाईटवरील प्रसारणाचे हक्क जिओ सिनेमाकडे आहेत. मात्र, फेअर प्लेनं बेकायदेशीरपणे त्या सामन्यांचं प्रसारण केल्याची तक्रार सायबर पोलिसांकडे देण्यात आली होती. याशिवाय या फेअरप्लेवरुन लोकसभा निवडणुकीच्या निकाला दरम्यान ऑनलाईन बेटींग करण्यात आल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, फेअर प्ले प्रकरणात ईडीकडून अधिक चौकशी आणि तपास सुरु असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR