22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeराष्ट्रीयकेजरीवाल यांच्या खासगी सचिवांच्या घरावर ईडीची छापेमारी

केजरीवाल यांच्या खासगी सचिवांच्या घरावर ईडीची छापेमारी

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पर्सनल सेक्रेटरी बिभव कुमार आणि ‘आप’चे खासदार एन. डी. गुप्ता यांच्या घरावर मंगळवारी (६ फेब्रुवारी) ईडीने छापा टाकला. तपास यंत्रणा दिल्लीतील ‘आप’चे नेते आणि त्यांच्याशी संबंधित लोकांच्या जवळपास १० ठिकाणांची झडती घेत आहे. ईडीची ही कारवाई मनी लाँड्रिंगशी संबंधित एका प्रकरणात करण्यात आली आहे.

ईडीच्या छाप्यादरम्यान दिल्लीचे मंत्री आतिशी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या म्हणाल्या, भाजपला आम्हाला दाबायचे आहे, पण आम्ही घाबरणार नाही. आम्ही घोटाळा केलेला नाही. वास्तविक ईडीच्या तपासातच घोटाळा आहे. ईडीने साक्षीदारांचे जबाब खोटे ठरवले.

दारू घोटाळ्याच्या तपासानंतर ईडीने सर्व ऑडिओ फुटेज हटवल्याचा दावा आतिशी यांनी केला आहे. ज्यांच्याकडून निवेदने घेण्यात आली, त्यांनी दबावाखाली निवेदने दिल्याचे सांगितले. आतिशी यांनी ऑडिओ डिलीट करून ईडीला कोणाला वाचवायचे आहे, असा सवाल केला.

अरविंद केजरीवाल शुक्रवारी (२ फेब्रुवारी) मद्य धोरण प्रकरणी पाचव्या समन्सनंतरही अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर झाले नाहीत. दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने केजरीवाल यांना १७ जानेवारी, ३ जानेवारी, २१ डिसेंबर आणि २ नोव्हेंबर रोजी ४ समन्स बजावले आहेत. केजरीवाल आजपर्यंत एकदाही हजर झाले नाहीत. याप्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि ‘आप’चे खासदार संजय सिंह तुरुंगात आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR