28.8 C
Latur
Tuesday, March 18, 2025
Homeराष्ट्रीयसोरोस यांच्­याशी संबंधित संस्­थांवर ‘ईडी’चे छापे

सोरोस यांच्­याशी संबंधित संस्­थांवर ‘ईडी’चे छापे

बंगळुरू : वृत्तसंस्था
केंद्र सरकारविरुद्ध जनमत भडकवण्याचा आरोप असलेले हंगेरियन वंशाचे अमेरिकन उद्योगपती जॉर्ज सोरोस यांच्याशी संबंधित संस्थांवर सक्­तवसुली संचालनालयाने (ईडी) छापे टाकले. आज (दि. १८) सकाळी ओपन सोसायटी फाउंडेशनशी संबंधितांवर ही कारवाई करण्­यात आली. याशिवाय, ओपन सोरोस फाउंडेशन (ओएसएफ) शी संबंधित इतर काही कंपन्यांवरही छापे टाकण्यात आले आहेत. परकीय चलन व्यवस्थापन कायद्या (फेमा)चे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्­यात आली आहे.

जॉर्ज सोरोसच्या संस्थांनी २०२१ मध्ये भारतात ४ लाख डॉलर्सपेक्षा जास्त खर्च केले. परकीय चलन घोटाळ्याचा भाग म्हणून ओएसएफ आणि काही आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांच्या परिसराची झडती घेण्यात येत आहे. ऍम्नेस्टी इंटरनॅशनलच्या माजी कर्मचा-यांच्या ठिकाणांवर ही छापेमारी करण्यात आली आहे. डिसेंबर २०२० मध्ये ऍम्नेस्टी इंटरनॅशनलला भारतात काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय, बेकायदेशीरपणे परदेशी निधी मिळाल्याचा आरोप असल्याने त्यांची बँक खातीही सरकारने जप्त करण्याचे आदेश दिले होते.

‘ओएसएफ’ची सुरुवात जॉर्ज सोरोस यांनी १९९९ मध्ये केली होती. भाजपने आरोप केला होता की, काँग्रेस पक्ष जॉर्ज सोरोसच्या सहकार्याने देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. जॉर्ज सोरोस हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत आणि त्यांच्याकडे ७.२ अब्ज डॉलर्स म्हणजेच ६१ हजार कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे म्हटले जाते. ईडीच्या कारवाईबाबत ओएसएफकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. हंगेरियन-अमेरिकन राजकीय कार्यकर्ते सोरोस आणि त्यांची संघटना ओएसएफवर सत्ताधारी भाजपने देश हितांविरुद्ध काम केल्याचा आरोप केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR