परभणी/प्रतिनिधी
पुरोगामी विचाराचे दैनिक एकमतचे व्यवस्थापकीय संपादक मंगेश डोंग्रजकर यांना लोकराजा राजर्षी शाहू राष्ट्रीय पुरस्काराने नुकतेच सन्मानीत करण्यात आले आहे. या पुरस्काराबद्दल परभणी येथे संपादक डोंग्रजकर मंगळवार, दि.९ जुलै रोजी बैठकीसाठी आले असता परभणी व हिंगोली कार्यालयातर्फे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
एकमतचे संपादक डोंग्रजकर परभणी येथे मंगळवारी बैठकीसाठी आले असता परभणी व हिंगोली कार्यालयातर्फे त्यांचा लोकराजा राजर्षी शाहू राष्ट्रीय पुरस्कारा मिळाल्याबद्दल शाल, पुष्पगुच्छ व भव्य हार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी हिंगोली कार्यालय व उपस्थित पत्रकारांनी संपादक डोंग्रजकर यांचा सत्कार केला. यावेळी जाहिरात व्यवस्थापक संदीप तिरूखे, नांदेड विभाग आवृत्ती प्रमुख चारूदत्त चौधरी, विक्रम कातळे, नांदेड व्यवस्थापक राहूूल गजेंद्रगडकर, हिंगोली जिल्हा प्रतिनिधी आय.डी. पठाण, परभणी जिल्हा प्रतिनिधी प्रविण चौधरी, परभणी कार्यालय उपसंपादक सुधीर बोर्डे, सेलू येथील जेष्ठ पत्रकार दिलीप डासाळकर, परभणी तालुका प्रतिनिधी डी.के. इनामदार, झरी प्रतिनिधी समीर खतीब, पालम प्रतिनिधी राहूल गायकवाड, पूर्णा प्रतिनिधी सुशील गायकवाड, तरोडा प्रतिनिधी शेख जाफर तरोडेकर, पालम प्रतिनिधी विकास पाटील, पाथरी प्रतिनिधी अन्वर शेख, किशन इक्कर आदिंची उपस्थिती होती. यावेळी एकमतच्या सर्व प्रतिनिधींनी संपादक डोंग्रजकर यांचा सत्कार करून त्यांना पुरस्काराबद्दल शुभेच्छा दिल्या.
यावेळी नांदेड विभाग आवृत्ती प्रमुख चारूदत्त चौधरी यांचा देखील वाढदिवस निमित्ताने सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नांदेड विभाग आवृत्ती प्रमुख चारूदत्त चौधरी यांनी केले.