28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रएकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका

एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका

  मुख्यमंत्र्यांनी केली एअर ऍम्ब्युलन्सची सोय

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळत आहे. साम टीव्हीने यासंदर्भातील बातमी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ एअर ऍम्ब्युलन्सची सोय करुन दिली आहे. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे. हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळताच मुख्यमंर्त्यांनी तात्काळ सुत्रे हलवली आहेत.

एकनाथ खडसे यांना उपचारासाठी मुंबईतील हॉस्पिटलमध्ये आणले जाणार असल्याची माहिती आहे. दुपारच्या सुमारास खडसे यांना छातीमध्ये दुखत होते. त्यानंतर तात्काळ त्यांना स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती सध्या ठीक असल्याचे समजतंय. मुख्यमंत्री शिंदे यांना याची माहिती कळल्यानंतर त्यांनी खडसे यांना उपचारासाठी मुंबईत आणण्याची तयारी सुरु केली आहे. त्यांच्यासाठी एअर ऍम्ब्युलन्सची सोय करण्यात आली आहे.

दुपारच्या सुमारास एकनाथ खडसे यांना छातीमध्ये दुखू लागलं होतं. त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याचे कळते. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे खडसेंना उपचारासाठी मुंबईत आणणार असल्याचं कळतंय. मुख्यमंर्त्यांनी संबंधितांना याबाबात सूचना दिल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR