22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रवायकर यांना निवडणूक आयोगाची नोटीस

वायकर यांना निवडणूक आयोगाची नोटीस

मुंबई : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. वायकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर त्यांना महायुतीकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. यानंतर आता पुन्हा एकदा वायकर चर्चेत आले आहेत. महायुती शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांना निवडणूक खर्चात तफावत आढळल्यामुळे निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे.

खर्चातील तफावत स्पष्ट करण्यासाठी त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे सांगितले की, मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्च नोंदवहीची निरीक्षकांसमोर १३ मे रोजी द्वितीय तपासणी करण्यात आली होती. तेव्हा २१ उमेदवारांपैकी १९ उमेदवारांनी खर्च सादर केले होते. यावेळी उमेदवार रवींद्र वायकर यांना खर्चातील तफावतीबाबत नोटीस देण्यात आली आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांची अचानक साथ सोडल्याने ठाकरे गटाकडून रवींद्र वायकरांना नोटीस बजावण्यात आली होती. रवींद्र वायकर हे आमदार आहेत. त्यामुळे आम्ही तुम्हाला अपात्र का करू नये? अशी नोटीस ठाकरे गटाने रवींद्र वायकर यांना पाठवली आहे. यासंदर्भात विधानसभा अध्­यक्षांनाही पत्र देण्­यात येणार असल्­याचे सांगण्­यात आले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR