22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeसोलापूरराष्ट्रवादी अजित पवार गट प्रदेश युवक सरचिटणीसपदी चेतन गायकवाड यांची निवड

राष्ट्रवादी अजित पवार गट प्रदेश युवक सरचिटणीसपदी चेतन गायकवाड यांची निवड

सोलापूर – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रदेश युवक सरचिटणीसपदी चेतन नागेश गायकवाड यांची निवड करण्यात आली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते मुंबईतील राष्ट्रवादी कार्यालयात चेतन गायकवाड यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव, माजी नगरसेवक नागेश गायकवाड, प्रा. श्रीनिवास कोंडी, परिवहन समितीचे माजी सभापती आनंद मुस्तारे, प्रांतिक सदस्य महेश निकंबे, पंढरपूरचे फारुख बागवान आदी उपस्थित होते.

गेल्या पाच वर्षांपासून गायकवाड हे राजकारण व समाजकारणात सक्रिय आहेत. वडील माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांचा वारसा घेऊन ते मार्गक्रमण करीत आहेत. युवकांची मोठी फळी त्यांच्यासोबत आहे. अत्यंत मितभाषी, संयमी अशा या युवा नेतृत्वाकडे अजित पवार गटाकडून युवक प्रदेश सरचिटणीसपदी निवड झाल्याने त्यांच्यावर मोठी जबाबदारी आली आहे.या निवडीबद्दल माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार बबनदादा शिंदे, यशवंत माने,संजय शिंदे, माजी आमदार राजन पाटील, अजित पवार गटाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, शहराध्यक्ष संतोष पवार यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR