24.2 C
Latur
Tuesday, February 25, 2025
Homeसोलापूरकिसान काँग्रेस कार्याध्यक्षपदी सुरेश शेट्टी यांची निवड

किसान काँग्रेस कार्याध्यक्षपदी सुरेश शेट्टी यांची निवड

सोलापूर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी किसान काँग्रेसच्या राज्याच्या कार्याध्यक्षपदी उद्योगपती सुरेश शेट्टी यांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या शुभहस्ते अखिल भारतीय किसान काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक महाराष्ट्राचे प्रभारी प्रकाश घाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरेश शेट्टी यांना मुंबई येथे नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी किसान काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय चौगुले उपस्थित होते.

देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्यध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील जिल्हा उपाध्यक्ष राशिद शेख सरचिटणीस भीमराव बाळगे किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष संग्राम चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR