17.1 C
Latur
Friday, January 23, 2026
Homeअंतरराष्ट्रीयनेपाळमध्ये मार्चमध्ये निवडणूक

नेपाळमध्ये मार्चमध्ये निवडणूक

जेन झी आंदोलनाच्या काही महिन्यांतच लागली निवडणूक चार माजी पंतप्रधान रिंगणात

काठमांडू : नेपाळमधील जेन झी आंदोलनाच्या काही महिन्यांनी पाच मार्च रोजी होणा-या सार्वत्रिक निवडणुकीत चार माजी पंतप्रधानांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. नेपाळ कम्युनिस्ट पार्टी (युनायटेड मार्क्सवादी-लेनिनवादी)चे अध्यक्ष व पदच्युत पंतप्रधान के. पी. शर्मा ओली झापा-५ मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. नेपाळ कम्युनिस्ट पार्टी (माओवादी सेंटर)चे माजी पंतप्रधान पुष्पकमल दहल ‘प्रचंड’ यांनी रुकुम पूर्व मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. इतर दोन माजी पंतप्रधान, नेपाळी कम्युनिस्ट पार्टीचे माधव कुमार नेपाल व प्रगतीशील लोकतांत्रिक पार्टीचे बाबुराम भट्टराई यांनी अनुक्रमे रौतहट-१ आणि गोरखा-२ मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

केवळ माजी पंतप्रधानच निवडणुकीच्या रिंगणात नाहीत, तर देशभरातील तीन महापौरांनीही निवडणुकीत आपले नशीब आजमावण्यासाठी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे. यात काठमांडू महानगरपालिकेचे माजी महापौर बालेन्द्र शाह ‘बालेन’ हे प्रमुख आणि लोकप्रिय आहेत. त्यांनी पूर्व नेपाळमधील झापा-५ मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला. धरानचे महापौर हरका संपंग हे सुनसरी-१मधून निवडणूक लढवत आहेत. प्रचंड यांची कन्या रेणू दाहाल या भरतपूरच्या महापौर होत्या. त्या चितवन-३ मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR