24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeअंतरराष्ट्रीयबांगलादेशमध्ये निवडणुकांना हिंसक वळण

बांगलादेशमध्ये निवडणुकांना हिंसक वळण

ढाका : बांगलादेशमध्ये मतदानाच्या दरम्यान चटगांवच्या पहारी कॉलेजमध्ये दोन पक्षांमध्ये झालेल्या हाणामारीत दोन जणांचा गोळ्या झाडून मृत्यू झाल्याची बातमी आहे. हे चटगांव-१० मतदारसंघाचे क्षेत्र आहे. हलिसहर-पहारतली-खुळशी भागातील या मतदारसंघात नाओचे उमेदवार मोहम्मद मोहिउद्दीन असून चटगांव महापालिकेचे माजी महापौर मोहम्मद मंजूर आलम हे अपक्ष उमेदवार झाले आहेत. चटगांव मेट्रोपॉलिटन पोलिस डीसी नॉर्थ यांनी गोळीबाराच्या या घटनेला दुजोरा दिला आहे. याशिवाय चटगांवच्या एका महिला अध्यक्षाला अनियमिततेच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

बांगलादेशमध्ये मतदानादरम्यान हिंसक संघर्ष होण्याची भीती आधीच व्यक्त केली जात होती, कारण विरोधी पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. शेख हसीना पंतप्रधान असताना ते कधीही निवडणूक जिंकू शकत नाहीत, असा त्यांचा विश्वास आहे. देशभरात ३७ ठिकाणी गैरप्रकार झाल्याचे वृत्त आहे. निवडणूक आयोगाच्या नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील ३७ मतदान केंद्रांवर गैरप्रकार आणि अनियमिततेच्या घटना आढळून आल्या आहेत. बनावट मतदानाच्या आरोपाखाली सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR