22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमुख्य बातम्यानिवडणुका ‘ईव्हीएम’वर होणार!

निवडणुका ‘ईव्हीएम’वर होणार!

नवी दिल्ली : देशातील अनेक राजकीय पक्ष आणि नेते वारंवार इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करत असतात. खासकरुन पराभव झाला की, ईव्हीएम मशीनमुळे आपण हरलो, या मशीनमध्ये घोटाळा करुन विजय मिळवता येतो, असा काही नेत्यांचा, पक्षांचा दावा असतो. महापालिका निवडणूक असो, विधानसभेची किंवा लोकसभेची. निकाल जाहीर झाला की, हरलेला पक्ष किंवा विरोधी पक्षातली मंडळी ‘ईव्हीएम’च्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करतात. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये कसा घोटाळा करता येऊ शकतो, त्याचे सादरीकरण करतात. आता लोकसभा निवडणुकीचा काळ आहे. कधीही लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमांची घोषणा होऊ शकते. अशावेळी ईव्हीएम विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

एक नाही, तर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनबद्दल आक्षेपाच्या वेगवेगळ्या याचिका होत्या. आता सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक आयोगाला मोठा दिलासा मिळाला आहे. ईव्हीएम बाबत दाखल करण्यात आलेल्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या कामकाजात अनियमितता असल्याचे आरोप करणा-या याचिका फेटाळल्या आहेत. लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वी निवडणूक आयोगासाठी हा मोठा दिलासा आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR