23.9 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeसोलापूरप्रीसिजनकडून मनपाला इलेक्ट्रिक घंटागाड्या प्रदान

प्रीसिजनकडून मनपाला इलेक्ट्रिक घंटागाड्या प्रदान

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका, सोलापूर व प्रीसिजन कॅमशाफ्ट लिमिटेड, सोलापूर यांचे संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा अभियानांतर्गत इलेक्ट्रिक व्हेईकलला चालना देणेकामी प्रिसिजन समूहाकडून सोलापूर महानगरपालिकेला शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी इलेक्ट्रिक घंटा गाड्या हस्तांतर करण्यात आल्या. त्यावेळी सोलापूर महापालिका आयुक्त शीतल तेली – उगले, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, प्रिसिजनचे चेअरमन यतिन शहा, कार्यकारी संचालक करण शहा व प्रीसिजनचे अधिकारी हे उपस्थित होते.

सोलापूर महापालिकेस प्रीसिजनने दोन नवीन रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक लाईट कमर्शियल व्हेइकल्स प्रात्यक्षिकासाठी बनवून दिल्या आहेत ज्याचा वापर महापालिका घंटागाड्यांसाठी करेल. महापालिकेच्या सर्व घंटागाड्यांचे रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये रूपांतर झाल्यानंतर इंधनावर होणारा मोठा खर्च वाचेल आणि कार्बन डायऑकसाईडचे होणारे उत्सर्जन वाचेल. शिवाय, रहिवासी क्षेत्रात होणार आवाजाचा स्तरही लक्षणीयरित्या कमी होईल. याप्रसंगी महापलिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांना इलेक्ट्रिक घंटा गाडी हस्तांरण करताना प्रीसीजनचे चेअरमन यतीन शहा, करण शहा आदी उपस्थीत होते.

प्रिसिजन समूहाच्या ईमॉस या कंपनीने ह्या इलेक्ट्रिक गाड्यांचे उत्पादन सोलापूर येथे सुरू केले आहे. ही उत्पादित केलेली घंटा गाडी पूर्णतः स्वदेशी असून १००% इलेक्ट्रिक आहे. एका चार्जमध्ये ७० ते १०० कि.मी. चालेल एवढी रेंज आहे. ह्या गाडीला फास्ट चार्जिंगची सुविधा असून फक्त ३० मिनिटांमध्ये ती १००% चार्ज होते. या गाडीची प्रति कि.मी. रनिंग कॉस्ट ही डिझेल गाडीच्या तुलनेत ८०% कमी आहे.
यावेळी सफाई अधीक्षक अनिल चराटे सफाई, वाहन अधीक्षक नागनाथ मेंडगुळे, माधव देशपांडे, संदीप पिस्के, सुभा जाधव, शुभम उजळंबे आदी मान्यवर उपस्थित होते.

सोलापूर महानगर पालिकेकडे संपूर्ण शहरातील कचरा एकत्रित करण्यासाठी जवळपास १९० घंटागाड्या आहेत. (लाईट कमर्शियल व्हेइकल्स) या १५५ घंटागाड्यांना १०० टक्के इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये रूपांतरित करण्याचा सोलापूर महानगरपालिकेचा मानस आहे अशी माहिती महापालिकेचे आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिली. या घंटागाड्यांचे रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये रूपांतर झाल्यानंतर इंधनावर होणारा खर्च कमी होईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR