31.9 C
Latur
Thursday, May 30, 2024
Homeधाराशिवलाच स्वीकारताना तहसीलदार यांचा ड्राइव्हर जाळ्यात

लाच स्वीकारताना तहसीलदार यांचा ड्राइव्हर जाळ्यात

कळंब: प्रतिनिधी
वाळूची वाहतूक सुरुळीत करुन देण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच घेताना कळंब येथील तहसीलदार यांच्या चालकाला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. तहसीलदार यांचा चालकाला पकडल्याने मोठी खळबळ उडाली. कोणाच्या सांगण्यावरुन या चालकाने पैशे घेतले याचा तपास लागणार का? तक्रारदार हे ट्रॅक्टरने वाळु वाहतुक करतात.

यातील आरोपी अनिल सुरवसे हे कळंब तहसिलदार यांचे वाहनावर वाहन चालक असुन त्याने तक्रारदार यांना वाळु वाहतुक करुन देण्यासाठी व वाळुचे ट्रॅक्टरवर कोणतीही कारवाई न करण्यासाठी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे महिन्याला हप्ता म्हणुन १५ हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ८ हजार रुपये लाच रक्कमेची मागणी केली.

लाच रक्कम तक्रारदार यांचेकडुन पंचासमक्ष स्विकारल्याने त्यास ताब्यात घेतले असुन पोलीस स्टेशन कळंब येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
या कार्यवाहीत पोलिस अधीक्षक संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी म्हणून पोलिस उपअधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे यांनी कारवाई केली. सापळा पथकात पोलीस अंमलदार दिनकर उगलमुगले, सचिन शेवाळे, नागेश शेरकर, चालक दत्तात्रय करडे याचा समावेश होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR