22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रपाण्याची टाकी साफ करताना विजेचा धक्का; ३ कामगारांचा मृत्यू

पाण्याची टाकी साफ करताना विजेचा धक्का; ३ कामगारांचा मृत्यू

अंबरनाथ : अंबरनाथमधून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. अंबरनाथजवळील जांभूळ गावात विजेचा धक्का लागून तीन कर्मचा-यांचा मृत्यू झाला. पाण्याच्या टाकीचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अंबरनाथमध्ये जवळगावात पाण्याच्या टाकीचे काम सुरू होते. यावेळी टाकीतून पाणी उपसण्याचे काम सुरू असताना पाणी उपसा करणा-या मोटारमधून विद्युत प्रवाह पाण्यात उतरला. पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्यामुळे कामगारांना विजेचा धक्का बसला ज्यामध्ये तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

गुलशन मंडल, राजन मंडल आणि शालिग्राम कुमार मंडल अशी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांची नावे आहेत. या तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात आणण्यात आले आहेत. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR