25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यातील वीज पुरवठा होणार विस्कळीत?

राज्यातील वीज पुरवठा होणार विस्कळीत?

कंत्राटी वीज कर्मचा-यांचे आंदोलन तीव्र

नागपूर : कंत्राटी कामगारांच्या संयुक्त कृती समितीने कामगारांच्या मागण्यांसाठी २० फेब्रुवारीला धरणे, २८ फेब्रुवारीपासून दोन दिवस काम बंद तर ५ मार्चपासून बेमुदत काम बंदची नोटीस तिन्ही वीज कंपन्यांसह सरकारला दिली आहे. यामुळे राज्यातील वीज यंत्रणा विस्कळीत होण्याचा धोका आहे.

महावितरण, महानिर्मिती, महापारेषण या सरकारी वीज कंपन्यांमध्ये सुमारे ४२ हजार कंत्राटी कामगार वर्षानुवर्षे कंत्राटी म्हणूनच सेवा देत आहेत. त्यांना स्थायी करण्याच्या मागणीसाठी वेळोवेळी आंदोलन झाले. परंतु, आश्वासनापलीकडे काही मिळाले नाही. त्यामुळे कंत्राटी कामगार संतप्त झाले आहेत. दरम्यान, राज्यातील २५ हून जास्त कामगार संघटनांनी ३ फेब्रुवारीला ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर या गृह शहरात एकत्र येत आंदोलनाचा निर्णय घेतला. त्यानुसार, २१ फेब्रुवारीला राज्यभरात सकाळी १० ते ५.३० दरम्यान धरणे, दुस-या टप्प्यात २८ आणि २९ फेब्रुवारीला राज्यभरात ४८ तास काम बंद केले जाईल. त्यानंतरही सरकारने मागण्या मान्य न केल्यास ५ मार्चपासून बेमुदत काम बंद करणार असल्याचे संयुक्त कृति समितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR