संतोष देशमुखांच्या हत्येविरोधात विरोधकांचा एल्गार

बीड : प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्याने जिल्हा ढवळून निघाला. या खुनाला १६ दिवस उलटूनही मुख्य आरोपी मोकाटच आहेत. बीड पोलिसांवर अगोदरच आरोपींना पाठीशी घालण्याचा आरोप होत आहे. तर सीआयडी सुद्धा आरोपींचा माग काढण्यास सपशेल अपयशी ठरल्याचे दिसते. त्यावरून विरोधक आता आक्रमक झाले आहेत. शनिवारी याविरोधात विरोधक मोर्चा काढणार आहेत. या मोर्चात ज्येष्ठ नेते शरद पवार सहभागी होणार असल्याची माहिती खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बीडचा बिहार होत असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. बीडमध्ये अराजकता, दहशत आणि गुंडागर्दी वाढली आहे. खंडणी वसूल करण्यात येत आहे. गुन्हेगारी वाढलेली आहे. त्याला राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घडामोडीवर खासदार सोनवणे यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी अजित पवार यांना खोचक टोला लगावला. अजितदादांनी या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद घ्यावे, असे ते म्हणाले. अर्थात पालकमंत्री कुणीही व्हावे, कुणालाही करावे. पण संतोष देशमुख यांच्या मारेक-याला अटक करा, अशी मागणी त्यांनी केली.

या सर्व घटनेत पोलिसांच्या निष्क्रियतेवर आणि आरोपींना पाठीशी घालण्याच्या प्रकाराविरोधात विरोधक आक्रमक झाले आहेत. शनिवारी बीडमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यात शरद पवार, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक नेते सहभागी होणार आहेत. बीडचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी याविषयीची माहिती दिली.

२८ डिसेंबर रोजीच्या मोर्चात कोण सहभागी होणार माहीत नाही. अंजली दमानिया सहभागी होणार की नाही माहीत नाही. पण मी मात्र या मोर्चात सहभागी होणार आहे. खासदार म्हणून माझी जबाबदारी आहे. मी सहभागी होणार आहे, असे ते म्हणाले.

१ जानेवारी रोजी उपोषण
१ तारखेपासून तपास नाही लागला तर मी उपोषणाला बसेन. जोपर्यंत प्रकरणाचा छडा लागणार नाही, तोपर्यंत उठणार नाही, अशी भूमिका सोनवणे यांनी जाहीर केली. त्यामुळे पोलिस यंत्रणेने या प्रकरणाच्या खोलात जावे. देवेंद्र फडणवीस हे कर्तव्यदक्ष आहेत. ते न्याय देतील अशी आशा आहे, असे ते म्हणाले.

१२०० लोकांकडे पिस्तूल
बीडचा बिहार करण्यास राजकारणी जबाबदार आहेत. बीडमध्ये सर्वाधिक लोकांकडे रिव्हॉल्व्हर आहेत. या रिव्हॉल्व्हरसाठी शिफारस कुणी केली, त्याची चौकशी झाली पाहिजे. आम्हाला रिव्हॉल्व्हरची गरज लागत नाही. ज्यांना लागते त्यांना विचारा. १२०० लोकांनी रिव्हॉल्व्हर घेतली असे तुम्ही सांगता. पण त्यापेक्षा दुप्पट लोकांकडे रिव्हॉल्व्हर असतील. जेवढे गोळीबाराच्या घटनेत पकडले त्यांच्याकडे रिव्हॉल्व्हरचे लायसेन्स नव्हते, असा आरोप खासदारांनी केला.

खासदार बजरंग सोनवणे यांच्या पाच मागण्या
२८ आणि २९ नोव्हेंबर रोजी कुणाला बोलावले होते, कुणी बोलावले होते तपासून काढा. ६ डिसेंबर रोजी जी केस झाली, त्याचा सीडीआर काढा. त्यात अ‍ॅट्रॉसिटी का घेतली नाही ते काढा ९ तारखेला गुन्हा दाखल केला. किडनॅपिंगचा गुन्हा तीन तास लेट का केला त्याचा तपास करा. पोलिसांना कुणाकुणाचे फोन आले होते त्याचा सीडीआर काढा. पकडण्यात आलेल्या आरोपीच्या मोबाईलचा सीडीआर काढा. इथल्या पीएसआय, पीआयचे सीडीआर काढा. बीड जिल्ह्यात अनेक पीआय आहेत त्यांच्या बदल्या करा. मटक्याचे धंदे बंद करा. बीड जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था प्रस्थापित करा.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पिके सुकली! कोरडा दुष्काळ जाहीर करा, राजीव कसबेंची सरकारकडे मागणी
02:05
Video thumbnail
Latur|मातीपासून घडवला गणराया! केशवराज महाविद्यालयात १५० विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम
02:53
Video thumbnail
Nanded|हदगावमध्ये मराठा आरक्षणासाठी एल्गार! शिवसेना आमदाराच्या कार्यालयातच आमरण उपोषण
02:28
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा इम्पॅक्ट! लातूरला राज्यस्तरीय खो-खोचे यजमानपद
02:13
Video thumbnail
BIG BREAKING | तिरुका नदीत जळकोटच्या व्यक्तीचा मृतदेह; मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट
00:57
Video thumbnail
SOLAPUR|पडळकरांचा ताफा अडवला! मराठा आंदोलकांचा थेट सवाल; आरक्षणावर आमदारांनी स्पष्ट केली भूमिका
01:42
Video thumbnail
LATUR|गवळणीच्या सुरांनी लातूर दुमदुमलं! वासुदेव समाजाचा जन्माष्टमी सोहळा थाटात
03:55
Video thumbnail
LIVE- महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या आणि झटपट घडामोडी.
08:14
Video thumbnail
BIG BREAKING | लातूर ट्रॅफिक पोलिसांचे मिशन ऑल आऊट! फटाका सायलेंसर, रॉंग साईड, मोबाईलवर कारवाई
02:01
Video thumbnail
BIG BREAKING | लातूर पोलिसांचा धडाका! ५९ हरवलेले मोबाईल शोधून मालकांना परत
03:31
Video thumbnail
Nanded Maratha Protest|मराठा रॅलीत आमदारांना धक्का! घोषणाबाजीनंतर काढता पाय
02:26
Video thumbnail
Latur|ऑक्टोबरमध्ये रंगणार थरार; लातूरच्या खेळाडूंची तयारी पाहा
03:24
Video thumbnail
Latur | लांबच्या प्रवासातील महिलांचे हाल संपणार? पेट्रोल पंपांवर स्वच्छ शौचालयांसाठी मोठा पुढाकार
05:46
Video thumbnail
BIG BREAKING | मराठा आरक्षणासाठी बोरगाव काळेत उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनाचा निर्धार
00:32
Video thumbnail
BIG BREAKING | नांदेड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद! सकाळपासून बाजारपेठा बंद, मराठा समाजाची मोठी रॅली
00:51

Latest news