कुवेत सिटी : कुवेतचे अमीर शेख नवाफ अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांचे निधन झाले आहे. कुवेतच्या अधिकृत वृत्तवाहिनीवर याची घोषणा करण्यात आली आहे. यापूर्वी टीव्हीवर प्रसारित होणारे नियमित कार्यक्रम अचानक बंद करून कुराणातील आयते दाखवण्यात आली. कुवेतमध्ये, हे सहसा तेव्हाच घडते जेव्हा राजघराण्यातील एखाद्याचे निधन होते. कुवेतचे आमिर काही दिवसांपासून आरोग्याच्या समस्यांशी झुंज देत होते आणि गेल्या महिन्यापूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शेख नवाफ अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांनी सप्टेंबर २०२० मध्ये कुवेतचे अमीर पद स्वीकारले होते.