नवी दिल्ली : शेतक-यांची पीक कापणी झाल्यानंतर होणारे नुकसान टाळणे गरजेचे आहे. पीक काढणीनंतरचे नुकसान टाळण्यासाठी योजनांवरही काम केले जात आहे. त्यासाठी आम्ही खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील भागीदारीवर लक्ष केंद्रीत करत आहोत, असे स्पष्ट करीत अर्थमंत्री निर्मला सीतारामण म्हणाल्या, तेलबिया उत्पादनाच्या अभियानाला बळ दिले जाईल. या अंतर्गतच नवीन कृषी तंत्रज्ञान आणि कृषी विम्याला चालना दिली जाणार आहे.
याशिवाय दुग्धव्यवसायाशी संबंधित शेतक-यांनाही मदत केली जाईल. राष्ट्रीय गोकुळ मिशनसारख्या योजना राबवल्या जात आहेत. सरकाकरकडून मत्स्य संपत्तीही बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सीफूड उत्पादन दुप्पट झाले असून मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून उत्पादकता ३ ते ५ टन प्रति हेक्टर वाढवली जाईल. त्यामुळे ५५ लाख नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या.