22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रशनिशिंगणापूरचे कर्मचारी सोमवारपासून जाणार संपावर

शनिशिंगणापूरचे कर्मचारी सोमवारपासून जाणार संपावर

अहमदनगर : शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टच्या कर्मचा-यांची आणि ट्रस्टची चौथी बैठकही निष्फळ ठरल्याने कर्मचा-यांनी सोमवारपासून संपावर जाण्याचा निश्चय केला आहे. अनुभव आणि शैक्षणिक पात्रतेनुसार पदनिश्चिती करावी, कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करावा यासह विविध १० मागण्या कर्मचा-यांनी केल्या होत्या. त्यातील किरकोळ मागण्या या देवस्थान ट्रस्टकडून पूर्ण करू असे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र मुख्य दोन मागण्या मान्य होत नसल्याने कर्मचारी आपल्या संपावर ठाम आहेत.

श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथील चारशे कर्मचारी हे सोमवारपासून संपावर जात आहेत. आपल्या विविध १० मागण्यांसाठी त्यांनी संपाचा इशारा दिला होता. याबाबत देवस्थान ट्रस्टसोबत कर्मचा-यांची चार वेळेला बैठक झाली. मात्र चारही वेळेला बैठक निष्फळ ठरली आहे. त्यामुळे या काळात भाविकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

शनिशिंगणापूर देवस्थानचे सर्व कर्मचारी २५ डिसेंबरपासून विविध मागण्यांसाठी संपावर जाणार आहेत. या संदर्भात देवस्थानच्या कामगार युनियनच्या वतीने देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात २५ मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी १० मागण्यांवर कर्मचारी ठाम आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR