कठुआ : जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे रविवार दि. २३ मार्च रोजी संध्याकाळी उशिरा सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना सर्व बाजूंनी घेरले आहे.
कठुआमधील हिरा नगरमधील सान्यालमध्ये पाच दहशतवादी दिसल्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली. दहशतवाद्यांची माहिती स्थानिकांनी सैन्याला दिली. पाच दहशतवादी लपल्याची माहिती दिली. शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. सैनिकांनी गोळीबार करून प्रत्युत्तर दिले.
सुरक्षा दलांनी सान्याल गावाजवळ शोध मोहीम सुरू केली. सुरक्षा दलांची संयुक्त टीम दहशतवाद्यांच्या जवळ पोहोचताच त्यांनी गोळीबार सुरू केला. या भागात अतिरिक्त सुरक्षा दल पाठवण्यात आले आहे. अधूनमधून गोळीबार सुरूच आहे.