21.2 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeमहाराष्ट्रकोल्हापुरात अतिक्रमण मुक्ती मोहीम

कोल्हापुरात अतिक्रमण मुक्ती मोहीम

कोल्हापूर : विशाळगडावरील अतिक्रमण मुक्ती मोहिमेसाठी माजी खासदार संभाजी राजे छत्रपती भवानी मंडपातील तुळजाभवानी देवीचा आशीर्वाद घेऊन कोल्हापुरातून विशाळगडावर जाऊन अतिक्रमण मुक्ती मोहीम राबविली.
सकाळी पिपाणी, हलकीचा ठेका, हाती भगवे झेंडे घेऊन ‘आई भवानी शक्ती दे, विशाळगडाला मुक्ती दे’, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घोषणांनी भवानी मंडप परिसर दणाणून सोडत कार्यकर्ते विशाळगडावर रवाना झाले होते.

विशाळगडगडावरील अनाधिकृत अतिक्रमण विरोधात रविवारी संभाजीराजे छत्रपती यांच्यासह कार्यकर्ते विशाळगडावर मार्गक्रमण करण्यासाठी कोल्हापुरातील भवानी मंडप परिसरात सकाळपासून जमा झाले. हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता. यावेळी याठिकाणी शाहीर आझाद नायकवडी यांनी विशाळगडाच्या इतिहासावर पोवाडा सादर केला.

कडेकोट पोलिस बंदोबस्त
किल्ले विशाळगडावर कोणतीही कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होवू नये याबाबत प्रशासन दक्ष आहे. या पार्श्वभूमीवर विशाळगडला पोलिस प्रशासनाने बंदोबस्त तैनात केला आहे. यामुळे गडावर छावणीचे रूप आले होते. गडावर जाणा-या भाविकांना व पर्यटकांना गडावर जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

सहकार्य करण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी काल रात्री उशिरा जिल्हा प्रशासना मार्फत शिवभक्तांना सहकार्य करण्याबरोबरच छ. संभाजीराजे यांना चर्चेसाठी येण्याचे आवाहन केले होते. जिल्हा प्रशासन त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR