25.2 C
Latur
Wednesday, July 23, 2025
Homeअंतरराष्ट्रीयउड्डाण करताच इंजिन पेटलं; ‘बोईंग’चे इमर्जन्सी लँडिंग

उड्डाण करताच इंजिन पेटलं; ‘बोईंग’चे इमर्जन्सी लँडिंग

लॉस एंजेलिस : वृत्तसंस्था
लॉस एंजेलिस येथून अ‍ॅटलांटा येथे जाणा-या डेल्टा एअरलाईन्सच्या फ्लाइट डीएल ४४६ ला उड्डाणानंतर थोड्याच वेळात डाव्या बाजूच्या इंजिनाला आग लागली. त्यामुळे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. बोईंग ७६७-४०० (नोंदणी एन८३६एमएच) द्वारे चालवले जाणारे फ्लाइट डीएल ४४६ या विमानच्या इंजिनात आग लागल्याचे निदर्शनास आल्यानंतर वैमानिकांनी तत्काळ आपत्कालीन स्थिती जाहीर केली आणि विमान लॉस एंजेलिस इंटरनॅशनल विमानतळावर उतरवले.

विमान उड्डाणानंतर काही वेळात पॅसिफिक महासागराच्या दिशेने गेले होते. मात्र, आग लागल्याचे संकेत मिळताच वैमानिकांनी तातडीने आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली आणि त्वरित परतीसाठी एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी)शी समन्वय साधला. विमान डाउनी आणि पॅरामाउंट शहरांवरून परत फिरले. विमानाने संपूर्ण उड्डाणादरम्यान स्थिर उंची आणि वेग राखला.

संबंधित विमानाला दोन जनरल इलेक्ट्रिक सीएफ ६ इंजिने आहेत. या घटनेची चौकशी फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (एफएए) करत आहे.

या वर्षी डेल्टा एअर लाईन्सशी संबंधित इंजिनमध्ये आग लागण्याची ही दुसरी घटना आहे. जानेवारीमध्ये फ्लाइट डीएल १०५, एअरबस ए ३३० निओ, ब्राझीलच्या सो पाउलोला जाताना अशाच प्रकारच्या समस्येमुळे टेकऑफनंतर लगेचच अ‍ॅटलांटाला परतावे लागले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR