23.8 C
Latur
Monday, August 11, 2025
Homeक्रीडाबस्स झाले, ऋषभ पंतला एकटे सोडा

बस्स झाले, ऋषभ पंतला एकटे सोडा

सचिन तेंडुलकरांच्या वक्तव्याने सर्वच अवाक

मुंबई : टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज ऋषभ पंत याने इंग्लंडविरोधीत कसोटी सामन्यात कमाल दाखवली. चौथ्या कसोटीत जखमी असतानाही त्याने दमदार खेळी खेळली. त्याने अर्धशतक ठोकले. जखमी असतानाही तो मैदानावर टिकून होता. त्याचे इंग्लंडच्या खेळाडूंनी पण कौतुक केले. आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी पंत विषयी काळजी व्यक्त केली. त्याला आता एकदम एकटे सोडा असे तेंडुलकर म्हणाले.

सचिन तेंडुलकर यांनी रेडिटच्या माध्यमातून ऋषभ पंतबाबत मत व्यक्त केले आहे. मला वाटते ऋषभ पंत याला एकटे सोडणे आवश्यक आहे. त्याच्याकडे अगोदरच खेळाचे नियोजन असते. तो त्याची अंमलबजावणी पण जबरदस्त करतो. तो जखमी असतानाही त्याने टीमची सोबत कायम ठेवली. त्याने मैदान सोडले नाही. मला हे पाहुन एकदम चांगले वाटले, अशा शब्दात तेंडुलकरांनी मत व्यक्त केले.

ऋषभ पंतचे प्रदर्शन या संपूर्ण कसोटीत जोरदार ठरले. त्यांनी चार कसोटी सामन्यांमध्ये ६८.४३ च्या सरासरीने ४७९ धावा काढल्या. पंतने या मालिकेत दोन शतक ठोकले. तर तीन अर्धशतक ठोकले. पहिल्या कसोटीच्या सामन्यांमध्ये भारतीय खेळाडुने शतक ठोकले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR