21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeअंतरराष्ट्रीयपाकिस्तानात घुसून पुन्हा इराणचा सर्जिकल स्ट्राईक

पाकिस्तानात घुसून पुन्हा इराणचा सर्जिकल स्ट्राईक

तेहरान : इराणने पुन्हा एकदा पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक केला आहे. इराणच्या लष्कराने जैश-अल-अदल या दहशतवादी संघटनेचा कमांडर इस्माईल शाहबक्ष आणि त्याच्या साथीदारांचा खात्मा केला आहे, असे इराण इंटरनॅशनल इंग्लिशने सरकारी मीडियाच्या हवाल्याने वृत्त दिले.

अलीकडच्या काळात इराण आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर हवाई हल्ले केले आहेत. जागतिक नियम मोडून इराण घुसत असल्याचा आरोप पाकिस्तान करत आहे, तर इराणही पाकिस्तानवर असेच आरोप करत आहे.

इराणने जैश अल-अदलला दहशतवादी संघटना म्हणून मान्यता दिली आहे. ही संस्था २०१२ साली अस्तित्वात आली. अल अरेबिया न्यूजच्या रिपोर्टनुसार, ही संघटना दक्षिण-पूर्वेकडील सिस्तान-बलुचिस्तान प्रांतात सक्रिय आहे. ही सुन्नी दहशतवादी संघटना आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR