नवी दिल्ली : बीसीसीआयने अफगाणिस्तान आणि इंग्लंड विरूद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा केली. शनिवारी दुपारी बीसीसीआयने भारतीय अ संघाची घोषणा केली. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी सराव सामन्यांमध्ये हा संघ इंग्लंड लायन्सचा सामना करेल.
बीसीसीआयने या संघात सरफराज खान आणि रजत पाटीदार यांना स्थान दिले आहे. अभिमन्यू ईश्वरनकडे या संघाची कमान सोपवण्यात आली आहे. याशिवाय टीम इंडियाकडून खेळलेला नवदीप सैनीही या संघाचा एक भाग आहे.
मात्र आश्चर्याची बाब म्हणजे रणजीमध्ये स्वत:ला सिद्ध करणा-या रिंकू सिंगला संघात स्थान मिळालेले नाही. केएस भरत हा या संघाचा एक भाग आहे. तसेच ध्रुव जुरेलची दुसरा यष्टिरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.
या सराव सामन्यातील पहिला सामना १२ आणि १३ जानेवारीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमच्या बी ग्राउंडवर होणार आहे. त्यानंतर १७ जानेवारी ते २० जानेवारी दरम्यान दुसरा सराव सामना नरेंद्र मोदी स्टेडियमच्या मुख्य मैदानावर खेळला जाईल. त्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका २५ जानेवारीपासून सुरू होणार आहे.
टीम इंडियाचा संघ – अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, सरफराज खान, प्रदोष रंजन पॉल, केएस भरत (यष्टीरक्षक), मानव सुथार, पुलकित नारंग, नवदीप सैनी, तुषार देशपांडे, विद्वत कवेरप्पा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक).