29.5 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeअंतरराष्ट्रीयआइसलँडमध्ये ज्वालामुखींचा उद्रेक, आणीबाणी जाहीर!

आइसलँडमध्ये ज्वालामुखींचा उद्रेक, आणीबाणी जाहीर!

आइसलँडमध्ये डिसेंबर महिन्यापासून ज्वालामुखींचा सातत्याने उद्रेक होतो आहे. देशात ब-याच ठिकाणी जमीन दुभंगली असून, मोठ्या प्रमाणात लाव्हा आणि मॅग्मा बाहेर येत आहे. यामुळे देशात स्टेट ऑफ इमर्जन्सी लागू करण्यात आली. या भागामधील इतर ज्वालामुखींवर आता वैज्ञानिक लक्ष ठेऊन आहेत.

लॅन्सेस्टर विद्यापीठातील डॉ. डेव्ह मॅकगार्व्हे यांनी सांगितले, की गेल्या वेळी जेव्हा असे उद्रेक झाले, तेव्हा त्यांची सुरुवात पूर्वेकडून झाली, आणि पुढे ते पश्चिमेकडे येत गेले. यंदा हे उद्रेकांचे चक्र २०२१ ससालापासूनच सुरू झाले होते. मात्र, हे अगदी मध्यापासूनच सुरू झाले आहे. त्यामुळे याबाबत कोणताही अंदाज बांधणे शक्य होत नाही असे डेव्ह म्हणाले.

सध्या डिसेंबरमध्ये झालेले उद्रेक हे पश्चिमेकडे होते. हे उद्रेक आधीच्या कोणत्याही नियमांमध्ये बसत नाहीत. त्यामुळे जमीनीखाली किती मॅग्मा आहे याचा अंदाज लावणे कठीण आहे. हे चक्र कधी थांबेल याबाबतही आम्हाला सध्या कल्पना नाही.

शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान
१० फेब्रुवारी पहाटे सहा वाजेपासून पुन्हा जमीनीखालून लाव्हा बाहेर येण्यास सुरुवात झाली. यामुळे शहरांमधील रस्त्यांना तडे गेले आहेत. शहरांमध्ये गरम पाणी पुरवणा-या पाईपलाईनचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कित्येक ठिकाणी तर तब्बल ३,००० फूट उंचीपर्यंत लाव्हाची राख उडत असल्याचे दिसत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR