नवी दिल्ली : इथिओपियाने आपल्या देशात पेट्रोल आणि डिझेल कारच्या आयातीवर बंदी घातली आहे. असा निर्णय घेणारा इथिओपिया हा जगातला पहिला देश ठरला आहे.
इथिओपियाच्या वाहतूक मंत्रालयाने जाहीर केले की ते आपल्या देशात इलेक्ट्रिक वाहनांशिवाय इतर कोणत्याही वाहनांना देशात प्रवेश करण्याची परवानगी देणार नाही. इथिओपिया सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. असे असून देखील येथील सरकारने असा निर्णय घेतला आहे.या निर्णयाचा त्यांच्या परकीय चलनात माठी तुट निर्माण होईल.
परिवहन मंत्री अलेमू सिमे यांनी इथिओपियाच्या लॉजिस्टिक मास्टर प्लॅनची घोषणा केली, ज्यामध्ये देशात हरित वाहतूकीवर भर देण्यात येणार आहे. इथियोपियन संसदेच्या शहरी विकास आणि वाहतूक स्थायी समितीसमोर परिवहन मंत्री सिमे यांनी हा प्रस्ताव सादर केला असून इलेक्ट्रिक वाहनाशिवाय इथिओपियामध्ये अन्य इंधनाच्या वाहनांना प्रवेश मिळणार नाही, असे ते म्हणाले.