मुंबई : देशभरात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे देशातील सर्वच राजकीय पक्षांकडून विरोधकांवर आरोप-प्रत्यारोप करायला सुरुवात झाली आहे. अशातच आता ‘‘मोडला जरी गटाचा कणा,‘पक्षप्रमुख’ तेवढे म्हणा!’’ म्हणत कवितेतून भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.
दरम्यान, आशिष शेलार सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा विरोधकांवर टीका करतात. अशातच आता, मोडला जरी पक्षाचा संसार, मोडला जरी गटाचा कणा तुम्ही इज्जत देऊन पक्षप्रमुख तेवढे म्हणा! असं म्हणत ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
आशिष शेलार यांनी एक्सवर कवी कुसुमाग्रजांच्या ‘फक्त लढ म्हणा’ या कवितेचे विडंबन करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्यांनी लिहिले आहे, ओळखलंत का राहुलजी मला? मुंबईतून आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी. क्षणभर बसले, नंतर हसले बोलले वरती पाहून काँग्रेसशी मैत्री केली, राम मंदिरावर अहंकारी टीका केली, गेला अख्खा पक्षच मला सोडून.