मुंबई : प्रतिनिधी
अनेकांना सापांची भीती वाटते. विषारी सापाच्या चाव्यामुळे थेट मृत्यू होण्याच्या घटना आपल्या डोळ्यासमोर घडलेल्या आहेत. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील पश्चिम घाटात सापाच्या एका विषारी जातीचा शोध लागला आहे. ही विषारी जात दिसायला एवढी खतरनाक आहे की या जातीला पाहिल्याबरोबर धडकी भरून मृत्यू होऊ शकतो. याचे नाव ओफियोफॅगस कलिंगा एसपी नोव असे ठेवण्यात आले आहे.
साप चावल्यानंतर मृत्यू झाल्याची अनेक प्रकरणं तुम्ही पाहिली असतील अन् ऐकली असतील. पण आता पश्चिम घाटात असा एक साप सापडला आहे, जो इतका खतरनाक आहे की त्याला पाहूनच अनेकांना धडकी भरणार आहे.
दरम्यान, भारतात आढळणा-या विषारी प्रजातींमध्ये किंग कोब्रा या विषारी जातीचा देखील समावेश होतो. सर्पदंशामुळे दरवर्षी ५८ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू होतो.
भारतात आढळणारा किंग कोब्रा या सापाच्या जातीची एक नवीन प्रजाती आढळली आहे. पश्चिम घाटातील जंगलांमध्ये ही सापाची नवीन जात आढळली असून ओफियोफॅगस कलिंगा एसपी नोव असे या जातीला नाव देण्यात आले आहे.
संशोधकांनी या जातीच्या सापाचा सखोल अभ्यासही केला आहे. ही नवीन जात फारच विषारी आहे. नव्याने आढळलेला किंग कोब्रा साप दिसायला फारच खतरनाक आहे. हा साप सामान्य किंग कोब्रापेक्षा आकाराने मोठा आहे. त्याचा रंग हा काळा आहे. तसेच या जातीच्या सापाच्या अंगावर पिवळ्या रेषा सुद्धा आहेत. त्याच्या पोटाकडील भाग हलक्या पिवळ्या रंगाचा असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. साप चावल्यानंतर त्यावर जर योग्य वेळेत उपचार केले गेले नाहीत तर मनुष्याचा मृत्यू होतो. मात्र सापाच्या या नवीन जातीला फक्त पाहिले तरी लोकांचा हार्ट अॅटॅकने मृत्यू होऊ शकतो. एवढी ही जात खतरनाक असल्याचा दावा करण्यात आला आहे.