24.1 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeअंतरराष्ट्रीयप्रत्येक आव्हान आम्हाला मजबूत बनवते

प्रत्येक आव्हान आम्हाला मजबूत बनवते

अमेरिकेतील आरोपांवर गौतम अदानी पहिल्यांदाच बोलले

नवी दिल्ली : अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी अमेरिकेतील अदानी समूहाच्या कंपन्यांवरील आरोपांवर प्रथमच भाष्य केले आहे. ते म्हणाले की समूहातील कोणत्याही कंपनीने किंवा व्यक्तीने कोणतेही गैरकृत्य केलेले नाही. कंपनीवर करण्यात आलेले सर्व आरोप निराधार आहेत. गौतम अदानी म्हणाले की, त्यांना राजकीय वादात अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे, परंतु अशा कृतींमुळे त्यांना मजबूत होण्यास प्रोत्साहन मिळते.

गौतम अदानी म्हणाले की, समूह कंपन्यांवर आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. असे आरोप यापूर्वीही होत आहेत. आम्ही ही आव्हाने स्वीकारतो आणि स्वत:ला आणखी मजबूत करतो. ते म्हणाले की, समूहातील कोणत्याही कंपनी किंवा व्यक्तीविरुद्ध अमेरिकेच्या फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस अ‍ॅक्टचे उल्लंघन किंवा कट रचल्याचा आरोप सिद्ध झालेला नाही. अदानी समूह जागतिक दर्जाच्या नियामक अनुपालनासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. अमेरिकेत झालेल्या आरोपांबाबत कंपनी आपली भूमिका ठामपणे मांडणार आहे.

यापूर्वीही आरोप झाले होते : अदानी
उद्योगपती गौतम अदानी म्हणाले की, जानेवारी २०२३ मध्येही आम्ही फॉलो-ऑन पब्लिक ऑफर सुरू करणार होतो. त्या दिवसांत कंपनीला परदेशातून शॉर्ट सेंिलग हल्ल्यांचा सामना करावा लागला. हा केवळ आर्थिक हल्ला नव्हता तर दुहेरी हल्ला होता. गटाच्या आर्थिक स्थैर्याला लक्ष्य करण्यात आले आणि आम्हीही राजकीय वादात अडकलो, परंतु धाडस दाखवत सर्व आरोपांना तत्परतेने उत्तर दिले. रत्ने आणि दागिने उद्योगाबाबत अदानी म्हणाले की, हा उद्योग केवळ आर्थिक विकासाचे माध्यम नाही तर भारताच्या सांस्कृतिक वारशाचेही प्रतीक आहे. यामुळे ५० लाख लोकांना रोजगार मिळाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR