योगेश कदम विरोधातील पुरावे मुख्यमंत्र्यांना दिले

मुंबई : प्रतिनिधी
गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रींच्या नावे असणा-या सावली डान्सबारमध्ये चालणा-या अवैध गोष्टी, पोलिसांनी घेतलेल्या धाडीत सापडलेले पुरावे तसेच कायदेशीर वाळू उपशाबाबतचे पुरावे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे पुरावे तपासून कदम यांचा राजीनामा घ्यावा. मुख्यमंत्र्यांनी एकतर कारवाई करावी अन्यथा हे पुरावे खोटे आहेत असे स्पष्ट करावे. कारवाई केली नाही तर मुख्यमंत्र्यांचेही डान्सबारला अभय आहे असे आम्ही समजू असेही परब म्हणाले.

अनिल परब यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधान परिषदेत गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या विरोधात आरोप करून जोरदार खळबळ उडवून दिली होती. सावली या डान्सबारवर पोलिसांनी रेड केली होती. हा डान्सबार योगेश कदम यांच्या मातोश्रींच्या नावे असल्याचे अनिल परब म्हणाले होते. या प्रकरणाचा पाठपुरावा महाविकास आघाडीने लावून धरला आहे. सोमवारी विविध विषयांवर ठाकरे गटाच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. मंगळवारच्या दिवशी अनिल परब यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेतली. या वेळी परब यांनी आपल्या आरोपांच्या पुष्ट्यर्थ कागदपत्रेही मुख्यमंत्री फडणवीस यांना सादर केली. या आधीही दोन वेळा या बारवर रेड झाली होती. त्यांना जबाबदारी झटकता येणार नाही.

योगेश कदम यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली आहे. हे पुरावे तपासून घेतो व त्यानंतर निर्णय घेतो असे मुख्यमंत्री म्हणाल्याचे परब यांनी सांगितले. एकनाथ शिंदे धर्मवीर आनंद दिघे यांच्या एका इशा-यावर ठाण्यातील डान्सबार फोडतात, असे चित्रपटात दाखविले आहे. तेच शिंदे आज डान्सबारला समर्थन देत आहेत. शिंदे आपल्या तत्त्वाशी प्रामाणिक नाहीत. खुर्ची वाचविण्यासाठी आमदारांच्या गैरकृत्यांवर पांघरूण घालत आहेत असेही परब म्हणाले.

मी माझी बाजू मांडेन : योगेश कदम
विधिमंडळाचे नियम पायदळी तुडवून परबांनी आपल्यावर आरोप केले. ते राज्यपालांकडे गेले होते कदाचित ते राष्ट्रपतींकडेही जातील; पण या खोट्या आरोपांनी माझे लक्ष विचलित होणार नाही. राज्यमंत्री म्हणून माझ्याकडे जी खाती माझ्याकडे आहेत. त्याच्या कामावर माझे लक्ष आहे. मी माझी बाजू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडेन, असे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
मास्टर ब्लास्टरचा पाककौशल्य 'सिक्सर'; सचिन तेंडुलकरने बनवले खास उकडीचे मोदक
00:40
Video thumbnail
थिएटरच्या स्क्रीनमधून थेट स्कॉर्पिओ बाहेर! व्हिडिओ पाहून प्रेक्षकांची धांदल
00:18
Video thumbnail
अभिषेक बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्याची दृश्ये कॅमेऱ्यात कैद; पहा 'क्लिअर' व्हिडिओ
00:30
Video thumbnail
मराठा आरक्षण आंदोलन; सरकारच्या सकारात्मक भूमिकेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी मागे घेतले उपोषण
00:56
Video thumbnail
Manoj Jaramge Andolan|मनोज जरांगेंच्या आंदोलनाचे पडसाद; लातुरात मराठा समाजाचा रास्ता रोको
01:35
Video thumbnail
Latur|जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प मिळून फक्त 32 टक्के पाणी साठा;अनेक गावांना तीव्र पाणी टंचाईच्या झळा.
03:04
Video thumbnail
Latur|डिझेल संपलं! लातूर जिल्ह्यात इंधन टंचाईचे सावट
02:29
Video thumbnail
Latur|NEET पेपरफुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकरच्या आर्थिक व्यवहारांचा CBI तपास...
04:33
Video thumbnail
Latur|माजी आमदार धिरज देशमुखांच्या पुढाकाराने कॅनॉलला पाणी; शेतकऱ्यांना मोठा दिलासा
02:35
Video thumbnail
साकोळ येथे बकरी ईदनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन; मुस्लीम बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
05:42
Video thumbnail
‘हिल हिल पोरी हिला’ वर डॅनी पंडित आणि धनश्री वर्माचा धमाका! पाहा भन्नाट डान्स रील.
00:58
Video thumbnail
नांदेडमध्ये काँग्रेसचा इंधन दरवाढीविरोधात हल्लाबोल;बैलगाडीतून दुचाकी नेत काँग्रेसचं अनोखं आंदोलन
02:09
Video thumbnail
Himayatnagar|नगराध्यक्ष उतरले थेट श्रमदानात!;हिमायतनगरच्या पाणीप्रश्नावर तोडगा
01:37
Video thumbnail
Latur\खंडापूर सप्ताहातील दानरक्कम घेऊन महाराज गायब?;“किशोर महाराजांना अटक करा” ; वारकऱ्यांचा आक्रोश
02:52
Video thumbnail
Latur|लातुरात शिवसेनेचा शक्तिप्रदर्शन मेळावा; २५ हजार कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
07:20

Latest news