24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीय‘ईवोएस-८’ सॅटेलाइट लॉन्च

‘ईवोएस-८’ सॅटेलाइट लॉन्च

इस्रोने इतिहास रचला होणार मोठा फायदा!

श्रीहरीकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने शुक्रवार दि. १६ ऑगस्ट रोजी सकाळी ९:१७ वाजता पुन्हा एकदा इतिहास घडवला असून इस्रोने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून एसएसएलव्ही-डी३ रॉकेट लॉन्च केले. या मिशनअंतर्गत देशाचे नवे अर्थ ऑब्झर्व्हेशन सॅटेलाइट ईवोएस-८ आणि एक छोटे सॅटेलाइट एसआर-० डेमोसॅट लॉन्च केले. हे दोन्ही सॅटेलाइट्स पृथ्वीपासून सुमारे ४७५ किलोमीटर एवढ्या उंचीवर असलेल्या गोलाकार कक्षेत स्थापित केले जातील. इस्रोचे हे लॉचिंग ऐतिहासिक मानले जात आहे.

इस्रोचे एसएसएलव्ही-डी३ रॉकेट लॉन्चिंग ऐतिहासिक मानले जात आहे, कारण हे दोन महत्वाचे सॅटेलाइट्स, ईवोएस-८ आणि एसआर-० डेमोसॅट ला पृथ्वीच्या खालच्या कक्षेत स्थापित करण्यासाठी एक महत्वाचे मिशन आहे. हे एसएसएलव्हीचे तिसरे लॉन्चिंग आहे आणि भारताच्या छोट्या सॅटेलाइट लॉन्च उद्योगासाटी एका मैलाचा दगड सिद्ध होऊ शकते. या शिवाय, ईवोएस-८ आणि एसआर-० डेमोसॅटच्या यशस्वी लॉन्चिंग आणि ऑपरेशनमुळे अंतराळ तंत्रज्ञानात भारताची आत्मनिर्भरता आणखी मजबूत होईल. हे जागतिक अंतराळ स्पर्धेत एक महत्वाचे योगदान असेल.

शेती, वन्यजीव आपत्तीमध्ये मदत मिळणार
एसएसएलव्ही-डी३ रॉकेट पृथ्वीच्या खालच्या कक्षेत ५०० किलोग्रॅमपर्यंतच्या सॅटेलाइट्सना ५०० किलोमीटर अथवा ३०० किलोग्रॅमच्या सॅटेलाइट्सना सन सिंक्रोनस ऑर्बिटमध्ये पाठवू शकते. या ऑर्बिटची उंची ५०० किलोमीटरच्या वर असते. या लॉन्चिंगमध्ये हे ४७५ किलोमीटरच्या ऊंचीपर्यंत जाईल. तेथे गेल्यानंतर ते सॅटेलाइटला सोडेल.

‘ईवोएस-८’ सॅटेलाइट
हे एक अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट आहे, याचा उद्देश पृथ्वीच्या पृष्ठभागाचे निरीक्षण करणे आणि महत्त्वपूर्ण डेटा गोळा करणे, असा आहे. याच्या सहाय्याने कृषी, वन्यजीव निरीक्षण, जलस्रोत व्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापन, यासारख्या महत्त्वाच्या कामांमध्येही मदत होईल.

एसआर-० डेमोसॅट
हे एक छोटे सॅटेलाइट आहे. जे पॅसेन्जर सॅटेलाइट म्हणून पाठवले जात आहे. नवीन तांत्रिक चाचण्यांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा याचा उद्देश आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR