24.7 C
Latur
Sunday, October 6, 2024
Homeमहाराष्ट्रएक्साईजचा कर्मचारी हिट अँड रनचा बळी

एक्साईजचा कर्मचारी हिट अँड रनचा बळी

मुंबई : मद्यसाठा घेऊन धावणा-या अज्ञात वाहनाचा पाठलाग करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सरकारी वाहन उलटल्याचा प्रकार चांदवड-मनमाड रोडवरील हरनुल टोलनाक्याजवळ घडला. या अपघातात राज्य उत्पादन शुल्कचा एक कर्मचारी जागीच ठार तर दोघे पोलिस जखमी झाले आहेत. पोलिसांकडून अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे.

नाशिकमध्ये घडलेल्या हिट अँड रन प्रकरणाची दखल आता राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली आहे. यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गुजरात राज्याच्या सिल्व्हासा येथून नवसारी येथे अवैध दारूसाठा वाहतूक करणा-या वाहनाचा राज्य उत्पादन शुल्क विभाग नाशिकच्या पथकाने लासलगाव येथील पोलिस कर्मचा-यांना सोबत घेत चांदवड-मनमाड रोडवर पाठलाग सुरू केला. यावेळी हरनूल शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वाहनाने अवैध दारू वाहतूक करणा-या वाहनाला अडवण्याचा करण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी त्या वाहनाने धडक दिल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वाहन रस्त्याच्या कडेला शेतात उलटले. या अपघातात चालक कैलास कसबे जागीच ठार झाला. तर तीन कर्मचारी जखमी झाले. अपघातानंतर पळून गेलेल्या वाहनाला पकडण्यासाठी नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे.

कठोर कारवाई करणार : शंभूराज देसाई
राज्य उत्पादन शुल्कच्या नाशिक विभागाच्या दोन टीमला विदेशी बनावटीची दारू एका वाहनात असल्याचा माहिती मिळाली. त्यानंतर ते या वाहनाचा पाठलाग करत होते. पण टीमवर हल्ला करण्यात आला. यामध्ये एक कर्मचारी मृत्युमुखी पडला तर दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. आम्ही संबंधित मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबाला विभागाकडून मदत देऊ. पण आमची जी मोहीम सुरू आहे ती अशीच सुरु राहील. कर्तव्य बजावत असताना कर्मर्चा­याचा जीव घेणं योग्य नाही. यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. ती गाडी अजूनही मिळाली नाही, पोलीस गाडीचा शोध सुरू आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR