16.2 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeछत्रपती संभाजीनगरशेंद्रा येथे रॅडिको कंपनीत स्फोट, ४ कामगार ठार

शेंद्रा येथे रॅडिको कंपनीत स्फोट, ४ कामगार ठार

शेकडो टन मक्याखाली दबले कामगार

छत्रपती संभाजीनगर : शेंद्रा एमआयडीसीमधील मद्यनिर्मिती करणा-या कंपनीत मक्याची साठवणूक करून ठेवण्यात आलेल्या टाकीचा स्फोट झाला. या घटनेत टाकीतील शेकडो टन मक्याच्या खाली अनेक कामगार दबले गेले आहेत. आतापर्यंत ४ कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

या घटनेची माहिती मिळताच फायर ब्रिगेडच्या जवानांसह करमाड पोलिसांनी आणि औद्योगिक सुरक्षा विभागाच्या अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली. मक्याखाली दबलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले. शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील रॅडिको एन. व्ही. डिस्टलरीज ही मद्य निर्मिती कंपनी २००८ पासून कार्यरत आहे.

या कंपनीत रोज ७०० ते ८०० कामगार कार्यरत असतात. या कंपनीच्या अंतर्गत स्टोअरेज विभाग आहे. तेथील एका टँकमध्ये ३ हजार टन क्षमतेच्या टाकीत मका साठवून ठेवण्यात आली होती. या टाकीजवळ कामगारांच्या येण्या-जाण्याचा मार्ग आहे. शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास अचानक ही टाकी फुटली आणि त्यातील मक्याचा ढिगारा तेथून ये-जा करणा-या कामगारांवर पडला.

यामुळे हे कामगार मक्याच्या ढिगा-याखाली दबले गेले. यात किती कामगार दबले, याचा अंदाज मिळू शकला नाही. परंतु अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले. यात चार कामगार दगावल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल, पोलिस आणि कंपनीतील कामगारांनी मदतीसाठी धाव घएतली. त्यावेळी चार कामगारांना बाहेर काढण्यात यश आले. यातील दोन कामगार बेशुद्ध होते. या चौघांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर शोध पथकाला चार कामगार मृत अवस्थेत आढळून आले. यासोबतच मक्याच्या ढिगा-याखाली आणखी कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली. त्यामुळे ढिगारा उपसण्याचे काम सुरू करण्यात आले.

जेसीबी, पोकलेनची मदत
मक्याच्या ढिगा-याखाली अडकलेल्या कामगारांचा शोध घेण्यासाठी तात्काळ जेसीबी आणि पोकलेनची मदत घेण्यात आली. त्यांच्या मदतीने मक्याच्या ढिगा-याखाली कामगारांचा शोध सुरू करण्यात आला. मात्र, उशिरापर्यंत ढिगारा उपसण्याची काम सुरूच होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR