21.4 C
Latur
Saturday, December 7, 2024
Homeमहाराष्ट्रअमरावती जिल्ह्यातच बच्चू कडू यांना धक्का

अमरावती जिल्ह्यातच बच्चू कडू यांना धक्का

प्रहारच्या उमेदवाराचा कॉंग्रेसला पाठिंबा

अमरावती : प्रतिनिधी
परिवर्तन महाशक्ती स्थापन करून मतदारांना तिसरा पर्याय देणा-या प्रहारच्या बच्चू कडूंना त्यांच्याच होम ग्राऊंडवर धक्का बसला. बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाच्या उमेदवाराने काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे कडू यांच्या अमरावती जिल्ह्यातच प्रहारला झटका बसला. प्रहारच्या अधिकृत उमेदवाराने माघार घेतल्याने कडू यांची गोची झाली.

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि विदर्भवादी नेते वामनराव चटप यांनी एकत्र येत परिवर्तन महाशक्तीची स्थापना केली. त्यांनी राज्यात १२१ उमेदवार दिलेले आहेत. त्यांच्या प्रचारासाठी बच्चू कडू राज्यभरात सभा घेत आहेत. पण कडू यांना त्यांच्याच मतदारसंघात धक्का बसला.

अमरावती जिल्ह्यातील अमरावती शहर विधानसभा मतदारसंघातून प्रहार जनशक्तीने डॉ. सय्यद अब्रार यांना उमेदवारी दिली. पण मतदानाला ४ दिवस राहिलेले असताना त्यांनी निवडणुकीतून माघार घेतलेली आहे. त्यांनी काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. सुनील देशमुख यांचा प्रचार करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

डॉ. अब्रार यांची माघार
अमरावतीच्या पश्चिम भागात मुस्लिम मतदारांची संख्या अधिक आहे. हीच बाब लक्षात घेऊन कडूंनी पेशाने दंत चिकित्सक असलेल्या डॉ. सय्यद अब्रार यांना उमेदवारी दिली. अब्रार गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. ते केवळ २० रुपयांत रुग्णांची तपासणी करतात. त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली.

राज ठाकरे यांच्या उमेदवाराचीही माघार
एकीकडे प्रहारच्या उमेदवाराने माघार घेतलेली असताना नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघातून राज ठाकरे यांच्या मनसेला धक्का बसला. नांदगावमधील मनसेचे उमेदवार अकबर सोनावला यांनी उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेत थेट ठाकरे गटात प्रवेश केला आणि ठाकरे गटाचे उमेदवार गणेश धात्रक यांना पाठिंबा दिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR