28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeअंतरराष्ट्रीयमोबाईलच्या लाईटमुळे मुलांमध्ये डोळ्याचा कर्करोग

मोबाईलच्या लाईटमुळे मुलांमध्ये डोळ्याचा कर्करोग

मुलांच्या आरोग्यावर इतका गंभीर परिणाम जगभरातून येतायेत अनेक प्रकरणे समोर

लंडन : आजकालचे युग हे मोबाईल युग आहे. मोबाईल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनल्याचे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आज आपण सगळेच स्मार्टफोन वापरतो, पण याच स्मार्टफोनचा तुमच्या मुलांच्या आरोग्यावर इतका गंभीर परिणाम होऊ शकतो. ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. एक महिला आपल्या मोबाईलने मुलाचा फोटो काढत असताना त्याच्या डोळ्यात असे काहीतरी दिसले, त्यानंतर त्याची प्रकृती आणखीनच बिघडली. तपासणीअंती असे लक्षात आले की त्या मुलाला डोळयाचा कर्करोग झाला आहे.

जगभरात अशी अनेक प्रकरणे वेळोवेळी समोर आली आहेत, जिथे लोक मोबाईलवर काहीतरी क्लिक करत होते आणि अचानक काही गोष्टी समोर आल्या आहेत, ज्याचा त्यांनी विचारही केला नव्हता. तुम्ही कधी ऐकले आहे की, एखाद्याला स्मार्टफोनद्वारे कर्करोगासारखा गंभीर आजार आढळला आहे. होय, असेच एक प्रकरण इंग्लंडमधील गिलिंगहॅम शहरातून समोर आले आहे. जिथे एका महिलेला तिच्या फोनच्या फ्लॅश लाईटमुळे कर्करोगाचा दुर्मिळ प्रकार आढळला आहे.

सारा हेजेस असे या महिलेचे नाव असून ती ४० वर्षांची आहे, तसेच तिला चार मुले आहेत. सारा हेजेस एके दिवशी रात्रीचे जेवण बनवत असताना, तिची थॉमस नावाच्या ३ महिन्यांच्या बाळावर नजर पडली. त्या महिलेला मुलाच्या डोळ्यात एक विचित्र पांढरी चमक दिसली, जी मांजरीच्या डोळ्यांसारखीच दिसत होती. महिलेने चिंतेत आपला स्मार्टफोन उचलला आणि तो फोटोंमध्ये टिपण्याचा विचार केला, ज्यासाठी त्याने फोनचा फ्लॅश लाईट वापरला. हे पाहून ती थोडी उत्सुक आणि काळजी करू लागली. साराने तिच्या मुलाच्या प्रकृतीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी इंटरनेटचा आधार घेतला.

डोळयातील चमक नाहीशी होतेय
महिलेने आपल्या स्मार्टफोनने फ्लॅश चालू केला आणि थॉमसचे काही फोटो घेतले, ती चमक पुन्हा एकदा कॅप्चर केली. एसडब्ल्यूएनएसच्या अहवालानुसार, ही चमक काही वेळाने नाहीशी होत असल्याचे दिसले. दुस-या दिवशी, साराने पुन्हा चमकेमागील गूढ उकलण्यासाठी काही नवीन पद्धती वापरल्या. तिने थॉमसला वेगवेगळ्या खोल्यांमध्ये फिरवले, वेगवेगळ्या प्रकाशात त्याचे बारकाईने निरीक्षण केले. मग अचानक ही चमक पुन्हा दिसली.

काय आहे रेटिनोब्लास्टोमा कर्करोग?
हा एक गंभीर आजार दर्शवत आहे, जो डोळ्यांचा कर्करोग असू शकतो. त्यानंतर ती स्त्री तिच्या मुलाला डॉक्टरांकडे घेऊन गेली, जिथे डॉक्टरांनी तिला सांगितले की, थॉमसला रेटिनोब्लास्टोमा आहे, जो डोळ्याच्या कर्करोगाचा एक दुर्मिळ आणि गंभीर प्रकार आहे. डोळ्यात पांढरा डाग किंवा चमक हे सामान्यत: या कर्करोगाचे पहिले लक्षण असते. कधीकधी हा पांढरा डाग दिसू शकतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR