22.5 C
Latur
Sunday, October 20, 2024
Homeमहाराष्ट्रकोळे-कोल्हे वादात फडणवीसांची शिष्टाई

कोळे-कोल्हे वादात फडणवीसांची शिष्टाई

अहिल्यानगर : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुतीत आल्यानंतर भाजपतील राजकीय परिवाराची कोंडी झालेल्या कोपरगाव विधानसभा मतदारसंघात काळे-कोल्हे यांच्यात उमेदवारीवरून पेच निर्माण झाला आहे. हा पारंपरिक वाद सोडविण्यासाठी स्वत: देवेंद्र फडणवीस शिष्टाईसाठी सरसावले आहेत.

अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांनी आपली उमेदवारी गृहीत धरत निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे भाजपच्या माजी आमदार स्रेहलता कोल्हे आणि विवेक कोल्हे हे मात्र अद्यापही कुठलाही निर्णय घेऊ शकले नाहीत.

काही महिन्यांपूर्वी विवेक कोल्हे यांनी शरद पवार यांच्या गाडीतून एकत्र प्रवास केल्याने तुतारी हाती घेण्याची चर्चा रंगली होती. विवेक कोल्हे यांच्यासमोर शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे शिवसेना हे दोन पर्याय आहेत. यावेळी कोपरगाव विधानसभेत काळे विरुद्ध कोल्हे लढत झाली तर कोल्हे हाती तुतारी घेणार की मशाल हे पाहणं महत्त्वाचं असेल.

पेच सोडविण्यासाठी फडणवीस मैदानात
दरम्यान, काळे आणि कोल्हे दोघेही महायुतीत आहेत. काळे आणि कोल्हे यांच्या व्यतिरिक्त इतरही अनेक जण विधानसभेसाठी इच्छुक आहेत. कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा पेच सोडवण्यासाठी स्वत: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत. भाजपच्या माजी आमदार स्रेहलता कोल्हेंना त्यांनी चर्चेसाठी बोलावले आहे.  आता कोल्हे नेमके कोणत्या पक्षात जाणार? की ते निवडणुकीतून माघार घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR