34.4 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeअंतरराष्ट्रीयभारतातील निवडणुकीदरम्यान फेक न्यूज रोखणार?

भारतातील निवडणुकीदरम्यान फेक न्यूज रोखणार?

अमेरिकन खासदाराची सोशल मीडिया कंपन्यांशी चर्चा भारताच्या निवडणुकीवर जगाचे लक्ष

वॉशिंग्टन : भारतात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. निवडणुकीच्या तारखा शनिवार दि. १६ मार्च रोजी दुपारी ३ वाजता जाहीर झाल्या असून यासोबतच देशभरात आचारसंहिताही लागू झाली आहे.

दरम्यान या सगळ्यात अमेरिकन खासदाराने सोशल मीडिया कंपन्यांना सवाल केला आहे की, भारतात होणा-या निवडणुकांसाठी त्यांनी काय तयारी केली आहे. मेटा-मालकीच्या व्हॉटस्अ‍ॅप या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अफवा आणि चुकीची माहिती पसरवण्याचा मोठा इतिहास आहे. हे पाहता अमेरिकन खासदार मायकेल बेनेट यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. अमेरिकेतील निवडणुकांवर लक्ष ठेवणा-या सिनेट इंटेलिजन्स अँड रुल्स कमिटीचे सदस्य असलेल्या खासदार मायकल बेनेट यांनी सोशल मीडिया कंपन्यांना पत्र लिहिले आहे. हे पत्र अल्फाबेट, मेटा आणि टीकटॉकला लिहिले आहे.

या कंपन्यांकडून भारतासह विविध देशांतील निवडणुकीच्या तयारीची माहिती मागवण्यात आली आहे. तुमच्या प्लॅटफॉर्मवर निवडणुकीसाठी निर्माण होणारे धोके नवीन नाहीत. यूजर्सनी मागील काळात डीपफेक आणि छेडछाड केलेला कन्टेट मोठ्या प्रमाणावर पसरवला होता असे बेनेट यांनी पत्राच्या सुरुवातील लिहिले आहे. पत्रात ते पुढे म्हणाले आता, कृत्रिम बुद्धिमत्ता एआय मॉडेल लोकशाही प्रक्रिया आणि राजकीय स्थिरता या दोन्हींची जोखीम वाढवणार आहेत. अत्याधुनिक अक साधनांच्या प्रसारामुळे कोणालाही सहजपणे खोटी छायाचित्रे प्रतिमा, व्हीडीओ आणि ऑडिओ तयार करणे सोपे झाले आहे.
यावर्षी ७० हून अधिक देशांमध्ये निवडणुका होत आहेत. यासाठी दोन अब्जाहून अधिक लोक मतदान करणार आहेत.

कोणत्या देशांत निवडणुका?
निवडणूक होत असलेल्या देशांमध्ये भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, क्रोएशिया, फिनलंड, घाना, आइसलँड, लिथुआनिया, नामिबिया, मेक्सिको, मोल्दोव्हा, मंगोलिया, पनामा, रोमानिया, सेनेगल, दक्षिण आफ्रिका, युनायटेड किंगडम यांचा समावेश आहे.

‘एआय’चा धोका कायम?
बेनेट यांनी एक्सचे एलोन मस्क, मेटाचे मार्क झुकरबर्ग, टिकटॉकचे शॉ जी च्यु आणि अल्फाबेटचे सुंदर पिचाई यांना पत्रे लिहिली आहेत. त्यांनी या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची निवडणूक-संबंधित धोरणे, कन्टेनट नियंत्रण पथकासह एआय निर्मीत कन्टेट ओळखण्यासाठी वापरत असलेल्या साधनांबद्दल माहितीची विनंती केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR