30.1 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeमुख्य बातम्यामहाराष्ट्रातील लोकसभा मतदान प्रक्रिया

महाराष्ट्रातील लोकसभा मतदान प्रक्रिया

नवी दिल्ली : महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे या तारखांना मतदान प्रक्रिया पार पडेल. तर ४ जून रोजी लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे.

लोकसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने शनिवारी दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांची घोषणा केली.

पहिला टप्पा – शुक्रवार, दि. १९ एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

दुसरा टप्पा – शुक्रवार, दि. २६ एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, ंिहगोली, नांदेड, परभणी

तिसरा टप्पा – मंगळवार, दि. ७ मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- स्ािंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

चौथा टप्पा – सोमवार, दि. १३ मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

पाचवा टप्पा- सोमवार, दि. २० मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR