28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रकांद्याच्या दरात घसरण

कांद्याच्या दरात घसरण

नाशिक : कांदा हे नगदी पीक म्हणून ओळखले जाते. परंतु हाच कांदा कधी शेतक-यांना रडवतो. परंतु कांदा नगदी पीक असल्यामुळे कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होत असते. यंदा देखील लाल कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. त्याचवेळी कांद्याचे दर घसरले आहेत.

महिन्याभरात कांदा अर्ध्या किमतीवर आला आहे. आवक वाढल्यामुळे कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. कांद्याची आवक वाढल्यामुळे भावात घसरण होत असल्याचे व्यापा-यांचे म्हणणे आहे.
दिवाळीनिमित्त नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या १२ दिवस बंद होत्या. त्यानंतर मालेगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरू झाला. कांद्याच्या भावात घसरण सुरू झाली आहे.

पंधरा दिवसांपूर्वी कांद्याला सरासरी प्रति क्विंटल ३२०० ते ३५०० इतका भाव मिळत होता. त्यात क्विंटलमागे ३०० ते ८०० रुपये घसरण झाली आहे. ६ नोव्हेंबर रोजी कांद्याला जास्तीतजास्त ४ हजार रुपये दर होता. आता कांद्याला प्रति क्विंटल २६०० ते ३२०० इतका भाव मिळत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. कांद्याच्या दरातील घसरण रोखण्यासाठी शासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी शेतक-यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR