17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रप्रसिद्ध बैलगाडा मालक पंढरीनाथ फडके यांचे निधन

प्रसिद्ध बैलगाडा मालक पंढरीनाथ फडके यांचे निधन

पनवेल : महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांचे आज (२१ फेब्रुवारी) रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पनवेलच्या विहीघरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं नाव घेतलं की अंगावर किलोभर सोनं, गाडीच्या टपावर बसून वरात आणि बादल बैलाची क्रेझ हे सगळे चित्र डोळ्यासमोर यायचें. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेवर तसेच फडके कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

पनवेल तालुक्यातील विहिघर येथील पंढरीनाथ फडके संपूर्ण महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीसाठी प्रसिद्ध होते. १९९६ पासून वडिलांमुळे पंढरीनाथ फडकेंना बैलगाडीचा नाद लागला. शर्यत जिंकल्यावर कोंबडा किंवा मेंढा मिळायचा तरीही शर्यत जिंकायची क्रेझ वेगळी होती. तिथपासून सुरू झालेली आवड फडकेंनी जपली होती. आतापर्यंत ४० ते ५० शर्यतींचे बैल त्यांनी राखून ठेवले होते.

कोणत्याही शर्यतीमध्ये एक नंबरला असलेला बैल पळायला लागला की त्याच्यावर पंढरीशेठ यांची नजर असायची. त्यानंतर त्याची कितीही किंमत असली तरी ते विकत घ्यायचे. त्यांच्याकडे महाराष्ट्रातील टॉपचा समजला जाणारा बादल बैल याने तब्बल ११ लाख रुपयांची शर्यत जिंकली होती. आज (२१ फेब्रुवारी) रोजी त्यांचे निधन झाले. पंढरी फडके हे ‘गोल्डन मॅन’ म्हणून ओळखले जायचे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR