28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमनोरंजनप्रसिद्ध निर्माते धीरजलाल शहा यांचे निधन

प्रसिद्ध निर्माते धीरजलाल शहा यांचे निधन

मुंबई : हिंदी सिनेसृष्टीतून एक वाईट बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता सनी देओल, प्रीति झिंटा, प्रियंका चोप्रा, शिल्पा शेट्टी, गोविंदा यांसारख्या प्रसिद्ध कलाकारांच्या सिनेमांचे प्रसिद्ध निर्माते धीरजलाल शहा यांचे निधन झाले आहे.

धीरजलाल शहा यांनी बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमांची निर्मिती केली. सोमवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील एका रुग्णालयात त्यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरू होते. अखेर ११ मार्च रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

हंसमुख शाह यांनी सांगितले की, धीरजलाल यांना कोविड काळात कोविडची लागण झाली होती. तेव्हापासून त्यांची काही ना काही शारीरिक दुखणी सुरू झाली होती. वारंवार त्यांची तब्येत बिघडत होती त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात यायचे.

त्यांनी पुढे सांगितले, ‘धीरज यांना कोरोनानंतर फुफ्फुसासंबंधी समस्या सतावू लागल्या होत्या. २० दिवसांआधी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. त्यांचे किडणी आणि हृदयासह इतर अवयव निकामी झाले होते’.

निर्माते धीरजलाल शहा यांच्या मृत्यूपश्चात त्यांची पत्नी मंजू धीर शाहर, दोन मुली शीतल पुनित आणि सपना धीरज शहा, मुलगा जिमित शहा आणि सून पूनम शहा असा परिवार आहे.

धीरजलाल यांच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचं झाल्यास, त्यांनी अनिल शर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली अनेक सिनेमांची निर्मिती केली होती. ‘हिरो : लव्ह स्टोरी ऑफ द स्पाय’, ‘कृष्णा’, ‘ग्लॅबर’, ‘विजयपथ’ सारख्या सिनेमांची निर्मिती केली आहे.
धीरजलाल यांच्याबरोबर अनेक सिनेमांत एकत्र काम केल्यानंतर दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्याबरोबर त्यांचे मैत्रीचे संबंध होते. धीरजलाल यांच्या मृत्यूनंतर अनिल शर्मा यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले, ‘ते फक्त चांगले निर्माते नाही तर चांगले माणूस होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR