16.5 C
Latur
Thursday, January 9, 2025
Homeनांदेडशेतकरी पिता-पुत्राची गळफास लावून आत्महत्या

शेतकरी पिता-पुत्राची गळफास लावून आत्महत्या

नांदेड : बिलोली तालुक्यातील मिनकी येथील अल्पभूधारक शेतकरी व त्याचा शाळकरी मुलगा या पिता-पुत्राने स्वत:च्या शेतात गळफास लावून आत्महत्या केली असल्याची घटना ९ रोजी गुरूवारी सकाळी ९ वाजता उघडकीस आली आहे.

मिनकी येथील अल्पभूधारक शेतकरी राजेंद्र लक्ष्मण पैलवार(४३) यांच्या कुटुंबात २ एकर जमीन आहे. त्या जमिनीवर साडे चार लाख रुपये महाराष्ट्र ग्रामीण बँक खतगाव शाखेचे कर्जासह काही खासगी कर्ज होते. शेतावर कर्ज व सततची नापिकी होत असल्याने मुलांचे शिक्षण खर्चबाबत नेहमी घरात आर्थिक ताण पडायचा. अशातच उदगीर येथे शिक्षणास असलेला ओमकार राजेंद्र पैलवार(१६) हा संक्रात निमित्त गावाकडे आला होता. तो दिनांक ८ रोजी बुधवारी दुपारी वडिलांना नवीन कपडे व शालेय साहित्यसह नवीन मोबाईल घेण्यासाठी पैसे मागत होता. परंतु वडिलांनी कांही दिवस थांब पैसे नाहीत पैसे आले की घेऊन देतो असे म्हटल्यावर मुलगा नाराज झाला. वडिलांनी पैसे दिले नाही म्हणून त्याने नैराश्यात येऊन रात्रीच्या वेळेस शेतातील झाडास गळफास लावत आत्महत्या केली.

मुलगा घरी नसल्याचे पाहून वडिलांनी दुस-या दिवशी सकाळी त्याची शोधाशोध करीत शेताकडे गेले असता शेतातील लिंबाच्या झाडाला मुलगा गळफास लावून आत्महत्या केल्याचे पाहताच वडिलांनी मुलाने गळफास लावलेली दोरखंड सोडून त्याचे दोरखंडाने त्याच झाडाला गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR