22.1 C
Latur
Friday, December 12, 2025
Homeराष्ट्रीयराजस्थानात शेतक-यांचे आंदोलन चिघळले

राजस्थानात शेतक-यांचे आंदोलन चिघळले

घरे सोडून पळाले लोक, इंटरनेट बंद हनुमानगडमध्ये कारखान्याचा विरोध

जयपूर : हनुमानगडमध्ये इथेनॉल फॅक्टरीवरून सुरू असलेल्या विरोध-प्रदर्शनात आज तणाव वाढण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते आणि शेतक-यांनी इशारा दिला आहे की मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू राहील.

गुरुवार सकाळपासून शेतक-यांनी प्रदर्शन स्थळाजवळील गुरुद्वारामध्ये पोहोचण्यास सुरुवात केली आहे. आजही जिल्ह्याच्या टिब्बी परिसरात इंटरनेट बंद आहे. तर, फॅक्टरीच्या आसपास राहणारे सुमारे ३० कुटुंबे घर सोडून पळून गेले आहेत. शेतक-यांनी जिल्ह्यातील राठीखेडा गावात निर्माणाधीन ड्यून इथेनॉल प्रायव्हेट लिमिटेड फॅक्टरीची भिंत तोडली. आत घुसलेल्या आंदोलकांनी ऑफिसलाही आग लावली. यानंतर पोलिस आणि शेतक-यांमध्ये जोरदार दगडफेक झाली. लाठीचार्ज आणि अश्रुधुराचे गोळे फेकल्याने संतप्त शेतक-यांनी १४ गाड्या जाळल्या. काँग्रेस आमदार अभिमन्यू पुनिया यांनाही लाठीचार्जमध्ये डोक्याला दुखापत झाली आहे. हिंसाचारात ५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तर, तणावामुळे या परिसरात शाळा-महाविद्यालये आणि इंटरनेट बंद राहिले.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
इथेनॉल प्लांटची निर्मिती
चंदीगडमध्ये नोंदणीकृत ड्यून इथेनॉल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी राठीखेडा येथे ४० मेगावॅटचा धान्य-आधारित इथेनॉल प्लांट उभारणार आहे. कंपनीचा दावा आहे की हा प्लांट केंद्राच्या इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल कार्यक्रमाला पाठिंबा देईल.
१० महिने शांततापूर्ण आंदोलन चालले
सप्टेंबर २०२४ ते जून २०२५ पर्यंत सुमारे १० महिने शांततापूर्ण आंदोलन चालले. जुलै २०२५ मध्ये आंदोलन तीव्र झाले. कंपनीने चार भिंतींचे (बाउंड्री वॉल) बांधकाम सुरू केले, ज्यामुळे शेतक-यांचा संताप वाढला.
फॅक्टरीचे बांधकाम पुन्हा सुरू झाल्याने नाराजी
१९ नोव्हेंबर २०२५ रोजी पोलिस संरक्षणात फॅक्टरीचे बांधकाम पुन्हा सुरू झाले. शेतकरी नेते महंगा सिंग यांच्यासह १२ हून अधिक शेतकरी नेत्यांना अटक. २०-२१ नोव्हेंबर रोजी ६७ जणांनी अटक दिली.
विरोध म्हणून कारखान्याची भिंत पाडली
बुधवारी दुपारी शेतक-यांनी टिब्बी एसडीएम कार्यालयासमोर मोठी सभा घेतली. सायंकाळी सुमारे 4 वाजता शेकडो शेतकरी ट्रॅक्टर घेऊन फॅक्टरी साइटवर पोहोचले. भिंत पाडण्यात आली आणि पोलिसांशी झटापट सुरू झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR