22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमुख्य बातम्याशेतक-यांना उद्या धनलाभ; ६ हजार रूपये जमा होणार!

शेतक-यांना उद्या धनलाभ; ६ हजार रूपये जमा होणार!

मुंबर्ई : राज्यातील लाखो शेतक-यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रातील शेतक-यांना एकाचवेळी राज्य आणि केंद्राचे मिळून ६ हजार रुपये जमा होणार आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा केंद्राचा १६ वा हफ्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता उद्या म्हणजेच २८ फेब्रुवारीला शेतक-यांच्या खात्यात जमा होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या शेतक-यांच्या खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हफ्ता हस्तांतरित करण्यात येणार आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतक-यांना मोठी भेट मिळणार आहे.

केंद्राचा आणि राज्याचा हप्ता एकाचवेळी
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १६ वा हप्ता (डिसेंबर २३ ते मार्च २०२४) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी यवतमाळ येथील समारंभात वितरीत होणार आहे. पीएम किसान योजने अंतर्गत रू. २०००/- तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत दुसरा व तिसरा हप्ता मिळून रू. ४०००/- असा एकुण रू. ६०००/- चा लाभ राज्यातील सुमारे ८८ लाख पात्र शेतकरी कुटुंबांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा करण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात येईल. केंद्र शासनाने २८ फेब्रुवारी २०२४ हा दिवस संपूर्ण देशभर पीएम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहे.

२०१९ पासून शेतक-यांसाठी खास योजना
शेतक-यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजना फेब्रुवारी २०१९ पासून सुरु केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षाखालील अपत्ये) रु. २०००/- प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रू. ६०००/- त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात लाभ जमा करण्यात येते.

पीएम किसान योजनेअंतर्गत २४ फेब्रुवारी २०२४ पर्यंत राज्यातील ११३.६० लाख शेतकरी कुटुंबांना एकूण १५ हप्त्यामध्ये २७,६३८ कोटीचा लाभ जमा झालेला आहे. आता १६ वा हप्ता उद्या जमा होणार आहे. राज्यात कृषि विभागामार्फत गावपातळीवर विशेष मोहीमेद्वारे राज्यातील सुमारे १८ लाख लाभार्थींची पी.एम.किसान योजनेच्या लाभासाठी आवश्यक बाबींची पूर्तता झालेली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR