नवी दिल्ली : पुन्हा एकदा शेतक-यांच्या आंदोलनामुळे दिल्ली चर्चेत आले आहे. नोएडा आणि ग्रेटर नोएडा डेव्हलपमेंट अॅथॉरिटीने डिसेंबर २०२३ पासून अधिग्रहित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यात वाढीव मोबदला आणि भूखंड मिळावेत या मागणीसाठी शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत. मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलन करत असल्यामुळे दिल्लीत गुरूवारी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी शेतकरी आंदोलनाबाबत सांगितले की, १६ फेब्रुवारीला देशभर चक्का जाम होणार आहे. १४ मार्चला शेतकरी दिल्लीकडे कूच करणार आहेत. त्यासाठी शेतक-यांनी तयारी करावी. भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी केले.
पंचायतीत टिकैत म्हणाले की, संयुक्त आघाडीच्या आवाहनावर १६ फेब्रुवारीला चक्का जाम होणार आहे. तर १४ मार्चला शेतकरी दिल्लीकडे कूच करणार आहेत. त्यासाठी शेतक-यांनी पूर्ण तयारी करावी. हक्कासाठी लढावे लागते. शेतकरी अनेक दिवसांपासून एमएसपीची मागणी करत आहेत. सरकार शेतक-यांना एमएसपी देत नाही. प्रत्येक वेळी अर्थसंकल्पात शेतक-यांची फसवणूक होते.
शेतक-यांची कामे होत नाहीत
भाकियू पश्चिम उत्तर प्रदेशचे अध्यक्ष पवन खटाना यांनी सांगितले की, गौतम बुद्ध नगरमध्ये जेवर विमानतळ बांधले जात आहे. गावे विस्थापित होत आहेत, पण शेतक-यांना त्यांच्या घराएवढी जमीन दिली जात नाही. भूसंपादन विधेयकात बराच काळ बदल झालेला नाही. जमीन बिलात बदल करावा, अशी मागणी शेतक-यांनी केली आहे. तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. मात्र, असे काहीही झालेले नाही. अधिकारी शेतक-यांना दिलेली आश्वासने मोडत आहेत, असेही टिकैत म्हणाले.