22.3 C
Latur
Saturday, October 26, 2024
Homeपरभणीशेतक-यांना शेतमाल व्यवस्थापन प्रशिक्षीत करण्याची आवश्यकता : कुलगुरू डॉ. इन्­द्र मणि

शेतक-यांना शेतमाल व्यवस्थापन प्रशिक्षीत करण्याची आवश्यकता : कुलगुरू डॉ. इन्­द्र मणि

परभणी : शेती व शेतकरी विकासाकरिता शासन, विद्यापीठ, विविध संस्­था यांनी एकत्रित कार्य करण्­याची आवश्­यकता आहे. शेतकरी बांधवाकरिता आपणास कार्य करण्­याची संधी मिळाली आहे. कृषि तंत्रज्ञानाच्­या आधारे शेतकरी विविध पिकांचे अधिकाधिक उत्­पादन घेत आहेत. आज शेतकरी जो भाजीपाल उत्­पादीत करतो त्­याच्­या विक्रीतील केवळ ३०-३५ टक्केचा हिस्­सा शेतकरी बांधवाला मिळतो, बाकी व्­यापारांना लाभ होतो. शेतकरी बांधवांना शेतमालाचे दर्जेदार शेतमाल निर्मिती, व्­यवस्­थापन आणि मार्केटिंग यावर प्रशिक्षित करण्­याची आवश्­यकता आहे. याकरिता प्रयत्­न करण्­यात यावेत. परळी तालुक्­यात विद्यापीठाची नवीन कृषी व कृषी व्­यवसाय व्­यवस्­थापन महाविद्यालये व एक संशोधन केंद्र स्­थापन झाले. यामाध्­यमातून आपण अधिक प्रभावीपणे कार्य करू शकतो असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. इन्­द्र मणि यांनी केले.

ग्­लोबल विकास ट्रस्­टच्­या माध्­यमातून परळी तालुक्­यातील ४२०० गावांत विविध कृषी विषयक उपक्रम राबविण्­यात येत आहेत. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ त्­यास तांत्रिक पाठबळ पुरवित आहे. गेल्­या वर्षी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि ग्­लोबल विकास ट्रस्­ट यांच्­या याकरिता सामंजस्­य करार झाला. वर्षभरात विद्यापीठाच्­या तज्ज्ञांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. दि. २६ ऑक्­टोबर रोजी कुलगुरू डॉ इन्­द्र मणि यांच्­या अध्­यक्षेखाली बैठक संपन्­न झाली. यावेळी ग्­लोबल विकास ट्रस्­टचे संस्थापक अध्­यक्ष मयंक गांधी, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्­तार शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवार, ट्रस्­टी संजय परमार, श्रीमती गांधी, डॉ. गजेंद्र लोंढे, डॉ. व्­ही. एस. खंदारे, डॉ. हिराकांत काळपांडे आदीसह विद्यापीठातील शास्­त्रज्ञ व ग्­लोबल विकास ट्रस्­टचे कर्मचारी उपस्थित होते.

ग्­लोबल विकास ट्रस्­टचे संस्थापक अध्­यक्ष मयंक गांधी यांनी ट्रस्­टव्­दारे राबविण्­यात येत असलेल्­या विविध उपक्रमांची माहिती देताना म्­हणाले की, ट्रस्­टचे कार्य परळी भागातील ४२०० गांवापर्यंत पोहचले असून शेतकरी बाधंवाचा आर्थिक प्रगती झाली आहे. या कार्याची व्­याप्­ती वाढविण्­याकरिता प्रयत्­न करण्­यात येत आहे. ट्रस्­टच्­या माध्­यमातून शेतकरी प्रशिक्षणाकरिता जागतिक दर्जाचे प्रशिक्षण केंद्र उभारण्­यात आले आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषि विषयक तांत्रिक पाठबळ भेटत आहे. जास्­तीत जास्­त फळपिकांची वृक्ष लागवड, शेतीत रासायनिक घटकांचा कमी वापर, हवामान बदलास अनुकूल तंत्रज्ञान आदी बाबींवर भर देण्­यात येत आहे असे सांगितले. प्रास्­ताविक डॉ. हिराकांत काळपांडे यांनी केले. बैठकीत विद्यापीठ व ट्रस्­टच्­या माध्­यमातुन शेतकरी विकास करिता राबविण्­यात येत असलेल्­या विविध उपक्रमांचा आढावा घेण्­यात आला. पुढील कायार्ची दिशा ठरविण्­यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR