कुर्डुवाडी : कुर्डु ता. माढा येथील बेंद ओढ्यात सिंचनासाठी पाणी सोडावे यामुळे परिसरातील १३ गावांनाही फायदा होणार आहे. या मागणीसाठी कुडू गावातील शेतकऱ्यांनी नागपूर येथे आंदोलन सुरू केले आहे. यापूर्वी कुई गावातील शेतकऱ्यांनी अनेक वेळा आंदोलने करूनही शासनाने दखल घेतली नाही. यामुळे शेतकऱ्यांनी नागपूर येथील आंदोलन सुरू केले आहे. या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास मुंबई मंत्रालयासमोर समस्त गावकरी जाऊन बसणार असल्याचाही इशारा यावेळी देण्यात आला.
आंदोलन स्थळी करमाळ्याचे आ. संजयमामा शिंदे यांनी भेट दीली असता कुईसह तेरा गावचा पाण्याचा प्रश्न शासनाने तातडीने सोडवावा यासाठी आपण पुर्वीपासुनच आग्रही असून लवकरात लवकर तो सोडवण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, अजित पवार यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनामध्ये कुर्डु ता. माढा हे गांव तालुक्यात लोकसंख्या व क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वांत मोठे गांव असून गांवातील बहुतांश लोकांचा शेती व दुग्ध व्यवसाय असून गांवातील बेंद ओढ्यावर कुई लगतील जवळपास १३ गांवाना पाण्याची सोय होते.
त्यामुळे बेंद ओढ्यास पाणी आल्यास जवळपास ३५ हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र प्रत्यक्षात सिंचनाखाली येणार आहे. यामुळे शासनाचा दरवर्षी होणार पिण्याचा पाण्याचा टैंकर व चारा छावणी वरील होणारा खर्चाचा बोजा कमी होणार आहे. यासाठी अनेक वर्षांपासून अनेक आंदोलने व उपोषणाच्या माध्यमातून हा विषय शासनदारी मांडलेला आहे. परंतु अद्याप शासनाकडून याची दखल घेतलेली नाही. सिंचनासाठीचे पाणी शेतक-यांशी निगडीत असून मागणी पूर्ण न झाल्याने नागपूर हिवाळी अधिवेशात आंदोलन सुरू केले आहे. तरी ही मागणी शासनाने तात्काळ पूर्ण करावी मागणी पुर्ण न झाल्यास गावांतील समस्त शेतकरी यांचे मुंबई मंत्रालय समोर तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल तरी ही वेळ न येऊ देता मागणीचा प्राधान्याने विचार करुन शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करावी या मागणीसाठी नागपूर येथे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
सिना माढा सिंचन योजनेचे शिराळ ते कुई राहिलेले अर्धवट काम पूर्ण करावे. सिना माढा सिंचन योजनेची शिल्लक पाईपलाईन शेडशिंगे येथे आणणे अथवा भिमा सिना जोडकालव्यातून बेंद ओढ्यात पाणी सोडणे. योजनेच्या माध्यमातून बेंद ओढ्यात पाणी सोडून कुर्डु व परिसरातील १३ गांवाचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे. यावेळी संदीप पाटील आण्णा ढाणे, संदिप पाटील, बाबा जगताप, अविराज माळी, श्रीकांत जगताप, संतोष जगताप, सुधीर लोढे, उमेश पाटील, रवि नरखेडकर, श्रीकांत गायकवाड, रामलिंग गाडे, तात्या माने, ऋषिकेश मुंगसे, गणेश जगताप, भारत कापरे, ज्ञानदेव चोपडे, विजय ठेंगल, सुरज पाटील, अनिल जगताप, गणेश घाडगे, तात्या माने, विजय भगत, विजय वाघमारे, सुजित भगत, माऊली उपासे, भाऊ चोपडे, गणेश जगताप, हनुमंत जगताप, अनिल पाटील, राम भानवसे, तानाजी हांडे, गुरुलिंग भाजीभाकरे, राजकुमार कुनाळे उपस्थित आहेत.